सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

लहान मुलांसाठी ‘खिलखिलाहट’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर ‘खिलखिलाहट’ रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

घाटकोपर येथील एन वॉर्ड येथे  पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमात अर्जदार पूनम नायर यांनी लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिका मिळत नसल्याने तत्काळ उपचार मिळत नाहीत,  अशी तक्रार केली होती त्यावर उत्तर देताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक ,आमदार पराग शहा, ‘एन वॉर्ड’ चे सहायक आयुक्त संजय सोनवणे,अपर जिल्हाधिकारी नीलिमा धायगुडे,निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, उपायुक्त देविदास क्षीरसागर, यासह  सर्व विभागाचे अधिकारी,  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मंत्री श्री.लोढा म्हणाले,गुजरात शासनाने लहान मुलांसाठी ‘खिलखिलाहट’ ही  रुग्णवाहिका योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर मुंबई उपनगर परिसर येथे ‘खिलखिलाहट’ रुग्णवाहिका सुरू करणार आहे.  जिल्ह्यातील समस्या जाणून घेवून त्यावर कार्यवाही करण्यात येइल.ज्या नागरिकांचे अर्ज प्राप्त आहेत त्यांच्या टोकन क्रमांकानुसार अर्ज निकाली काढू असे नागरिकांना त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून त्यावर जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री श्री.लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पालकमंत्री  यांनी  सर्व नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

- Advertisment -