दीक्षाभूमीवर “संकल्प”तर्फे तीन लाख अनुयायांना भोजनदानाचा लाभ
आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात गत ३५ वर्षांपासून उपक्रम सुरू
सारनाथचे भन्ते बौद्धप्रिय, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर : माजी ऊर्जा मंत्री आमदार नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात गत ३५ वर्षांपासून पवित्र दीक्षाभूमी येथे “संकल्प”सेवा भावी संस्थेच्या माध्यमाने धम्म चक्र प्रवर्तन दिनासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांना भोजनदान देण्यात येते. “संकल्प”च्या या उपक्रमाचा यंदा जवळपास ३ लाखांच्या जवळपास बौद्ध बांधवानी लाभ घेतला. तसेच अनेकांनी तृप्त होऊन आयोजकांना धन्यवाद दिले.
मंगळवारी ४ ऑक्टोबरला धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सारनाथचे भदंत बौद्धप्रिय, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते दीक्षाभूमीवरील अनुयायांना भोजनदान करून “संकल्प”च्या उपक्रमाची सुरुवात झाली होती. पावसाने काही काळ व्यत्यय निर्माण केला मात्र, संकल्पचे हे कार्य सुरूच होते. ४ ते ६ असे तीन दिवसांपासून “संकल्प”च्या कार्यकर्त्यांनी अविरत सेवा दिली. “संकल्प”च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जवळपास ३०० सेवकांनी सतत तीन दिवस अविरत दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायायांसाठी उत्तम अशी भोजनाची व्यवस्था केली.
“संकल्प” ही नोंदणीकृत सामाजिक संस्था मागील 3५ वर्षापासून दलित, शोषित, मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी अनेक विभिन्न कार्यक्रम सतत राबवित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, आर्थिक समतेचे व आमुलाग्र परिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी ही संघटना सातत्याने झटत आहे. तसेच सन 1986 पासून “संकल्प” संस्थेव्दारे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रमास देशाच्या विविध प्रांतातुन तसेच महाराष्ट्राच्या वेग-वेगळया जिल्हातून तसेच गाव खेड्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना दरवर्षी सतत 3 दिवस उत्तम भोजन उपलब्ध करुन देत आहे.
यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तनाला 66 वर्ष पूर्ण होत असल्याने यावेळी दिक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन वर्धापनदिनाचा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा झाला. धम्मयात्रेकरूंसाठी 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान
“संकल्प”च्यावतीने लाखो भाविकांसाठी अविरत भोजनाची व्यवस्था, शुध्द पेयजलाची व्यवस्था, विश्राम करण्यासाठी भव्य पेंडालची व्यवस्था, स्नानगृह व शौचालयाची व्यवस्था, शासनाच्या रोजगार संबंधी माहिती व इतर लोकापयोगी उपक्रम राबविण्यात आले. यंदा भव्य गर्दी बघता ३-४ लाख अनुयायांना भोजनदान करण्याचा मानस “संकल्प”च्यावतीने वर्तविण्यात आला आहे. हा उपक्रम माजी ऊर्जा मंत्री आमदार नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात पुढील तीन दिवस अविरत सुरु राहणार आहे.
उद्घाटनीय कार्यक्रमाला “संकल्प”चे अनिल नगरारे, अशोक हुमणे, राजा करवाडे, विनोद शेंडे, विनय सहारे, शशिकांत रायपुरे, साहेबराव सिरसाट आदी उपस्थित होते. या भोजनदान कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी निलेश खोब्रागडे, संतोष खडसे, पंकज नगरारे, राकेश इखार, राकेश निकोसे, पंकज सावरकर, सतीश पाली, आसिफ शेख यांच्यासह “संकल्प”च्या शेकडो कार्यकर्त्यांनी सतत तीन दिवस अविरत परिश्रम घेतले.


