सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सावरकरांना माफीवीर कुणी बनवलं? कॉँग्रेसने की भाजपने ?

सावरकरांना माफीवीर कुणी बनवलं? कॉँग्रेसने की भाजपने ?

१९८० च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो, *आम्हाला शिकविणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले, त्यांच्या विचारांनी भारलेले होते. बहुदा त्यांची ही शेवटचीच पिढी…*

माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक काँग्रेस विचारधारा मानणारे होते; पण त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही.*उलट* *आम्हाला आमची स्वतःची* *मतं* *व्यक्त करायला शिकवलं. केंद्रात आणि राज्यात* *काँग्रेसचीच सरकारे होती. पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात सावरकर होते…*

या देशासाठी योगदान देणार्‍या कोणालाही काँग्रेसने कधीच कमी लेखलं नाही. *मला आठवतं सावरकरांची “सागरा प्राण तळमळला” ही कविता आमचे हेच काँग्रेस विचाराचे असणारे गुरुजी किती तळमळीने डोळ्यात पाणी आणून शिकवायचे आणि ऐकताना आम्ही मूलमुली अक्षरशः रडायचो!!…* इतिहासाचे गुरुजी *समुद्रात घेतलेल्या उडीचं वर्णन करू लागले की, अंगावर शहारे उभे राहायचे* *आणि काळ्या पाण्याचे वेळी झालेला छळ ऐकला की मन सुन्न व्हायचं!* पण या मास्तरांनी कधीही *आम्हाला सावरकरांनी माफी मागितल्याचं, इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याचं किंवा आपल्या राष्ट्रपित्याच्या हत्येत त्यांच नाव आल्याचं कधीही आम्हाला कळू दिल नाही. कारण ते होते विरोधी मत असणाऱ्या माणसालाही आदर देणारे काँग्रेस आणि गांधी-नेहरूंच्या विचारांचे संस्कार!!* आमच्या मनामधे सावरकरांची प्रतिमा एक थोर साहित्यिक, राष्ट्र कवि आणि स्वातंत्र्यवीर अशीच कायम रुजवली गेली होती. म्हणून सावरकरांनीविषयी कमालीचा आदरही होता.

पण 2014 *भाजपा सरकार आले* आणि गांधी-नेहरू कसे हिंदू विरोधी हे दाखवायला आणि सावरकरच कसे वीर होते याची अतिशयोक्ती करण्याच्या नादात *गांधी-नेहरूंची बदनामी करायला सुरुवात केली गेली. इथूनच खऱ्या अर्थाने सावरकरांच्या वीरपणाची पडझड सुरू झाली. कारण क्रियेला प्रतिक्रिया तर येणारच ना!* डाव्यांनी मग उत्तरादाखल *आजपर्यंत माहीत नसलेले सावरकरांचे माफीनामे, त्यांची इंग्रजनिष्ठा, पेन्शन आणि इतर बाजू लोकांसमोर मांडायला सुरुवात केली.* काँग्रेसच्या 70 वर्षात सावरकरांची कधी बदनामी झाली नसेल *तेवढी 2014 पासून सुरू झाली.*

मला वैयक्तिकरित्या सुद्धा सावरकरांविषयी ह्या सगळ्या गोष्टी भाजप सरकार आल्याच्या नंतर कळल्या आणि सावरकरांविषयी पहिल्यासारखा आदर कमी व्हायला लागला. तरीही *एक साहित्यिक, एक कवी, एक मर्यादित विज्ञाननिष्ठ माणूस म्हणून आजही आदर आहेच.* मग आता तुम्हीच ठरवा *सावरकरांना माफीवीर कुणी बनवलं?*
सोप्प आहे…
तुमच्या आजूबाजूच्या कोणालाही विचारा, *सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून पेन्शन घेतली हे तुला कधी कळलं? उत्तर असेल 2014 नंतर…* मग आता तुम्हीच सांगा सावरकर #माफीवीर होते हे लोकांना कुणामुळे समजलं *कॉँग्रेस की भाजप

- Advertisment -