सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

आदिनाथ मंगेशकरांची संगीतमय मुलाखत २४ डिसेंबर रोजी

आदिनाथ मंगेशकरांची संगीतमय मुलाखत २४ डिसेंबर रोजी

डॉ. विनय वाईकर स्मृती प्रित्यर्थ सप्तकचे आयेाजन

नागपूर :सप्तकतर्फे साहित्यिक डॉ. विनय वाईकर स्मृतीप्रित्यर्थ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीवर आधारित संगीतमय मुलाखतीच्या कार्यक्रमाचे २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता कुलगुरू कालिदास सभागृह परसिस्टंट सिस्टम्स, गायत्रीनगर नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात लता मंगेशकर यांचे भाचे व पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे पूत्र व गायक आदिनाथ मंगेशकरांची मुलाखत अमित वाईकर घेतील. सोबत सुप्रसिद्ध गायिका विभावरी आपटे-जोशी यांच्‍या गायनाचा आस्‍वाद घेता येणार आहे.
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीमधील अजरामर गाणी, त्‍यासंदर्भातील आठवणींच्‍या माध्‍यमातून लता दीदींच्या स्मृतींना यानिमित्ताने उजाळा देण्यात येणार आहे.

प्रवासी भारतीय सन्मान प्राप्त अमित वाईकर आपल्या अनोख्या शैलीमध्ये आदिनाथ मंगेशकर यांची मुलाखत घेतील. यावेळी वाद्य वृंद महेंद्र ढोले आणि सहकारी यांचे असेल. हा कार्यक्रम केवळ सप्‍तक सभासद व निमंत्रितांसाठीच आहे, याची नोंद घ्‍यावी, असे वाईकर परिवार आणि सप्तक तर्फे कळविण्‍यात आले आहे.

- Advertisment -