सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

गायरान जमीन प्रकरणी मंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

नागपूर – ३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीरपणे देऊन पदाचा दुरुपयोग करून निर्णय घेतल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची चौकशी करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. २८९ अनव्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणले.

रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक ठिकाणी सत्तार यांनी न्यायालयाचे आदेश डावलून मनमानी पद्धतीने भूखंड, वाळूचे ठेके, कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन आपल्या अधिकार कक्षात नसतांना विकल्याचा किंवा वाटप केल्याचा आरोप केला. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील सत्तार यांना फटकारले होते याचा उल्लेख देखील दानवे यांनी केला. अशा मंत्र्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे, तसेच सभागृहात यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली. एकूण ५ प्रकरण ही न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाचे आदेश डावलून सत्तार यांनी स्वतः निर्णय घेतल्याचे दाखले दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीररित्या निर्णय घेतलेली एकूण ५ प्रकरण

३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीररित्या दिले. सविता थोरात यांची मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद रत्नागिरी कोकण प्रादेशिक विभागिय आयुक्त या प्रकरणातही कोकण विभाग आयुक्त व अधिकारी यांना अज्ञानात ठेऊन सत्तार यांनी निर्णय घेतला. तसेच संभाजीनगर येथील जयेश इन्फ्रा सावंगी नावाच्या कंपनीला सत्तार यांनी अधिकार नसतानाही नियमबाह्य व बेकायदेशीर आदेश दिले होते.

संभाजीनगर मध्ये ही अधिकार नसताना वाळू ठेकेदार यांना वाळूपत्ता बदलून देण्याचं काम केलं. संभाजीनगर जिन्सी येथील कृषी बाजार समितीच्या जागेबाबत ही सत्तार यांनी कार्यक्षमतेबाहेर जाऊन चुकीचा निर्णय दिला.

- Advertisment -