सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

म्‍युझिकल फाउंटनचे ‘ट्रायल शो’ 5 व 6 जानेवारी रोजी

म्‍युझिकल फाउंटनचे ‘ट्रायल शो’ 5 व 6 जानेवारी रोजी

नागपूर : समाजाच्‍या विविध क्षेत्रातील मान्‍यवरांच्‍या कौतुकास पात्र ठरलेल्‍या आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्‍या म्‍युझिकल फाउंटन आणि लाईट शो चे परत एकदा 5 व 6 जानेवारी 2023 दरम्‍यान ‘ट्रायल शो’ आयोजित करण्‍यात आले आहे. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीच्‍यावतीने रात्री 7 व 9 वाजता असे ‘ट्रायल शो’ होतील.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्‍या या म्‍युझिकल फाउंटेन शोला जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत लाभलेले असून बीग बी अम‍िताभ बच्‍चन, प्रख्‍यात गीतकार-दिग्‍दर्शक गुलजार व मराठीतील अतिशय लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांची कॉमेंट्री आहे.

नागपुरात सध्‍या राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या परिसरात इंडियन सायन्‍स कॉंग्रेस सुरू असून त्‍याकरिता राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरून मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी आले आहेत. त्‍यांच्‍याकरिता 5 जानेवारीला 6 वाजता आणि 6 जानेवारीला 7 वाजता असे दोन ट्रायल शो राखीव ठेवण्‍यात आले आहेत. दोन्ही दिवसांचे रात्री 9 वाजताचे शो नागपूरकरांसाठी खुले राहतील.

ट्रायल शोसाठी प्रवेशिका अनिवार्य असून एका प्रवेशिकेवर एका व्‍ यक्तिला प्रवेश दिला जाणार आहे. कार्यक्रमाच्‍या अर्धा तास आधी आपली जागा आरक्षित करावी व या संगीतमय फाउंटन शोचा आनंद घ्‍यावा, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी केले आहे.

पार्किंग व्यवस्था केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर, बॉटनिकल गार्डन, तेलंगखेड़ी गार्डन व गणपती विसर्जन स्थळ, फुटाळा येथे करण्‍यात आले असून पार्किंग पासून ते फाउंटेन पर्यंत मोफत ई-रिक्शा सुविधा उपलब्ध करून देण्‍यात आलेली आहे.

- Advertisment -