सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

‘वेव्हजऑफ मेलोडीज -२’ संगीतमय कार्यक्रम ९ जानेवारी रोजी

वेव्हजऑफ मेलोडीज -२’ संगीतमय कार्यक्रम ९ जानेवारी रोजी

नागपूर : भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय, नई दिल्ली व रंगभुमी, नागपूर यांच्या सयुक्त विद्यमाने युफोनी इव्हेंटस आयोजित वेव्हज ऑफ मेलोडीज -२ संगीतमय कार्यक्रम ९ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

स्टार गायक आणि द व्हॉइस (स्टार प्लस ) आणि इंडिया के मस्त कलंदर फेम (सब टीव्ही ) हामिद हुसेन गायन करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना रूही खान यांची असून नदीम खान आणि विलास कुबडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
यावेळी संजय हेडाऊ, साक्षी त्यागी, दिनेश जाधव, गीता राजगोपालन, नूतन सिंग, राजांनी हुद्दा, शकील कुरेशी, प्रशांत बोरकर, श्रीकांत साबळे, अरुण मेहरुलिया, उज्ज्वला बोरकर, यश पंढी, धनश्री भगत, तुषार रंगारी ही गायक मंडळी सुश्राव्य गीत प्रस्तुत करतील. ध्वनी नियोजन वाहिद भाई यांचे तर संगीत नियोजन महेंद्र ढोले यांचे आहे. सूत्रसंचालन समृद्धी कळाशिलकर करणार आहे.

कार्यक्रमात प्रवेश नि:शुल्क आहे. मोठ्या संख्येने श्रोत्यांना उपस्थित राहण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.
या कार्यक्रमात रशुद्धी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था, नागपूर तसेच प्रदूषण नियंत्रण व नागरी स्वास्थ्य संवर्धन बहुउद्देशीय संस्था, नागपूर, मानवशांती सांस्कृतिक प्रतिष्ठान कन्हान, ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था विहिरगाव, अजित बालक मंदिर वाडी,मागासवर्गीय गोपाल समाज कल्याणकारी संस्था माहुरझरी यांचा सहभाग आहे.

- Advertisment -