“कोरियन युध्दाचा इतिहास” म्हणजे युद्धाचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारे पुस्तक – निवृत्त कर्नल अभय पटवर्धन
“कोरियन युध्दाचा इतिहास” पुस्तकाचे थाटात प्रकाशन
नागपूर : कोरिया युद्धाची पार्श्वभूमी , कालावधी आणि त्यातील संघर्ष खूप मोठा असून त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन “कोरियन युध्दाचा इतिहास” या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) नागपूर तर्फे लेखक सुभाष कौशिककर लिखित “कोरियन युध्दाचा इतिहास” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज गृहिणी समाज हनुमाननगर येथे आयोजिण्यात आला त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक महामंडळ, विदर्भचे सचिव अॅड अविनाश तेलंग, ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) चे अध्यक्ष प्रा. प्रभुजी देशपांडे, लेखक सुभाष कौशिककर, साहित्य विहार प्रकाशनचे मकरंद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
पटवर्धन यांनी कोरिया युद्धाची पार्शवभूमी यावेळी थोडक्यात समजाऊन सांगितली. दुसऱ्या महायुद्धानंतर हे सर्वात मोठे युद्ध होते जे उत्तर कोरियाने अत्यंत चिकाटीने लढले. १९५०-१९५३ चा कालावधी कोरियाने मर्यादित मनुष्यबळ आणि पारंपरिक शास्त्र यांनी युद्ध लावून धरले आणि शेवटी अमेरिकेला पराभूत केले. इंग्रजी भाषेत या युद्धावर अनेक पुस्तके आहे मात्र मराठीत मध्ये हे एकमेव असावे असे म्हणाले. पुस्तकाचे प्रास्ताविक निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी लिहले आहे.
लेखक सुभाष कौशिककर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ‘ अमेरिकेने न जिंकलेले पहिले युद्ध’ असा कोरिया युद्धाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी भारताची भूमिका अलिप्ततावादाची असल्याचे सांगितले. परंतु भारताने या युद्धात बाजवलेलेया मानवतावादी कार्याची माहिती त्यांनी दिली. भारताने त्याकाळी युद्धग्रस्त ठिकाणी २ लाख २० हजार लोकांची सुषृशा केली. त्यात सैनिक आणि नागरिकांचा देखील समावेश होता अशी माहिती त्यांनी दिली.
अॅड अविनाश तेलंग यांनी पुस्तकाचे कौतुक करताना यातून घेण्यात येणाऱ्या शिकवणीवर भाष्य केले. सैनिकांचे योग्य व्यवस्थापन हे यातून शिकले जाऊ शकते असे ते म्हणाले.
“कोरियन युध्दाचा इतिहास” मध्ये लेखक सुभाष कौशिककर यांनी सध्या सोप्या भाषेत उत्तम माहिती आणि दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे साहित्य विहार प्रकाशनचे मकरंद कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले. या पूर्वी व्हिएतनाम युद्धाचे पुस्तक देखील साहित्य विहार ने प्रकाशित केल्याचे सांगून त्याची पहिली आवृत्ती संपली असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले.
सुरवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वजन करून शारदा स्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. शारदा स्तवन अदिती पेंढारकर यांनी प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे संचालन सुषमा जागीरदार यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक वाचक उपस्थित होते.


