किन्ही-धानोली येथे रासेयो ग्राम शिबिर
सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमात रंगली किन्ही धानोली
नागपूर : कुंभलकर सायंकालीन समाजकार्य महाविद्यालयाच्यावतीने किन्ही धानोली गावात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ग्रामशिबिराचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश कुंभलकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग, पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाळे, उपसरपंच संगिता भोये, प्राचार्य डॉ. अभय शेंडे, रासेयो अधिकारी डॉ. भीमराव मेश्राम, समन्वयक अधिकारी डॉ. विनायक साखरकर, डॉ. लक्ष्मीकांत चोपकर, डॉ. संजय फुलकर, डॉ. सीमा लाडे उपस्थित होते.

कुंभलकर महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रत्यक्ष कार्यानुभव मिळावा तसेच ग्रामीण स्तरावर प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळावी, यासाठी किन्ही धानोली गावात रासेयो शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भीमराव मेश्राम यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन उमेश नासरे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. अभय शेंडे यांनी केले. डॉ. फुलकर यांनी गावातील नागरिकांना शिबिराचे महत्व पटवून दिले.
किन्ही या गावातील विकास साधण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील तसेच गावातील समस्या शोधण्याचे मोलाचे कार्य विद्यार्थ्यांना करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा सेलच्या प्रमुख पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी शिबिराला भेट दिली. त्यांना ग्रामस्थांशी चर्चा करून कौटुंबिक हिंसाचार, कौटुंबिक वाद, कुटुंबातील समस्या, वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाय याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींना दामिनी पथक आणि पोलिसांची भूमिका समजावून सांगितली. यानंतर विद्यार्थ्यांनी नाट्य, गीत गायन आणि नृत्याचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. विनायक साखरकर, डॉ. संजय फुलकर यांनी केले. या कार्यक्रमात शुभांगी कुथे, सोनू भोयर, आशिष ताकसांडे, विलास मेश्राम, विवेक वानखडे, मयुरी उंदिरवाडे, दीक्षा अवघड, प्रणव जुनघरे, अनिल कांबळे, दिपाली गोसावी, प्राजक्ता शंभरकर, तस्कीन शेख, प्रियंका मेश्राम, मेघा उके, प्रणाली पावणे, प्रमिला गणवीर, अनिरुद्ध पाठक, प्रणाली पिंपळकर, सुमित खडसे, चैताली रामटेके, ईशा मेलवानी, मनिषा कांबळे, सरला वाघमारे यांनी सहभाग घेतला.


