सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

गुंतता… हृदय हे’ हृदयविकाराच्या गुंतागुंतीवर संगीतमय चर्चा १७ फेब्रुवारी रोजी

‘गुंतता… हृदय हे’ हृदयविकाराच्या गुंतागुंतीवर संगीतमय चर्चा १७ फेब्रुवारी रोजी

नागपूर : श्रीमती कमलाबाई देशपांडे मेमोरियल ट्रस्ट, नागपूर यांच्या सौजन्याने ऋतुराज प्रस्तुत हृदयविकाराच्या गुंतागुंतीवर संगीतमय चर्चेचा कार्यक्रम ‘गुंतता… हृदय हे! चे आयोजन शुक्रवार, दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्यकाळी ६.३० वाजता दि सायंटिफिक सोसायटी सभागृह, आठ रस्ता चौक, लक्ष्मी नगर, नागपुर येथे करण्यात आले आहे.

यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रभाकर के. देशपांडे, एम. डी. मेडीसिन हृदयविकाराच्या गुंतागुंतीवर चर्चेत सहभागी होतील. या कार्यक्रमाची संकल्पना मुग्धा तापस यांची असून कार्यक्रमाचे निवेदन किशोर गलांडे करतील.

यावेळी गुणवंत घटवाई, मंजिरी वैद्य-अय्यर, मुकुल पांडे ही गायक मंडळी कार्यक्रमाच्या संकल्पनेनुरूप गीते सादर करतील तर त्यांना परिमल जोशी, मोरेश्वर दहासहस्त्र, पंकज यादव,विशाल दहासहस्त्र, मुग्धा तापस साथ संगत करतील.

या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून श्रोत्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ऋतुराज तर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -