छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा १७ फेब्रुवारी पासून
मराठा विद्या प्रसारक समाजाचे आयोजन
देवराव प्रधान
नागपूर : मराठा विद्या प्रसारक समाज व नागरिक कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन सक्करदरा चौक परिसरात शुक्रवार १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे.
सायं. ६ वा. युवा सप्तखंजरी वादक श्री तुषार सुर्यवंशी यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम तसेच शनिवार १८ फेब्रुवारी २३ ला, सायं.६ वा. सौ.गौरी शिंदे (कुलस्वामिनी म्युझिकल ग्रुप) प्रस्तुत शिवसंध्या संगीतमय कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.१९ फेब्रुवारी २३ ला, दुपारी ४ वा. भव्य शोभायात्रेचे आयोजन संस्थेच्या सक्करदरा चौकातील प्रांगणातून करण्यात आले आहे. करिता याप्रसंगी समस्त शिव प्रेमी नागरिकांनी व समाज बांधवांनी सहपरिवारासह उपस्थिती राहावे, असे मराठा विद्या प्रसारक समाजाच्या तर्फे आवाहन करण्यात आले आहे.


