सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

पंतप्रधानांचे विशेष सल्लागार डॉ. दिपक वोहरा यांचे 19 फेब्रुवारी रोजी जाहीर व्याख्यान

पंतप्रधानांचे विशेष सल्लागार डॉ. दिपक वोहरा यांचे 19 फेब्रुवारी रोजी जाहीर व्याख्यान

‘2025 मध्ये जग आणि भारतासाठी व्यवसायाच्या संधी’ वर करणार मार्गदर्शन

विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनचा उपक्रम

नागपूर : पंतप्रधानांचे विशेष सल्लागार डॉ. दिपक वोहरा यांचे जाहीर व्याख्यान विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता परवाना भवन, किंग्सवे हॉस्पिटल, कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. डॉ. वोहरा व्हीएमएच्या ‘ऑगमेंट’ सत्रांतर्गत ‘2025 मध्ये जग आणि भारतासाठी व्यवसायाच्या संधी’ या मार्गदर्शन करतील.

पंतप्रधान, लेसोथो, दक्षिण सुदान आणि गिनी-बिसाऊ आणि लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल, कारगिल आणि लेह यांचे विशेष सल्लागार असलेले डॉ. दीपक वोहरा हे पंतप्रधान कार्यालयासाठी तंत्रज्ञान सल्लागार म्हणून ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून कार्यरत आहे. ते आर्मेनिया, जॉर्जिया, सुदान, दक्षिण सुदान, पोलंड आणि लिथुआनिया येथे भारताचे माजी राजदूत होते.

फ्रान्स, व्हिएतनाम, ट्युनिशिया, युनायटेड स्टेट्स, नायजेरिया, कॅमेरून, बेनिन, चाड, मलेशिया, पापुआ न्यू गिनी आणि स्पेनमध्ये त्यांनी सेवा दिली. राजदूत वोहरा फ्रेंच, स्पॅनिश, व्हिएतनामी, अरबी, बहासा मेलायू, हौसा, मोटू आणि आर्मेनियन या भाषा अस्खलितपणे बोलतात. जगातील सर्वात मोठ्या एनजीओ असलेल्या सुलभ इंटरनॅशनलशी ते 4 वर्षे संलग्न होते. 1973 च्या भारतीय परराष्ट्र सेवेच्या वर्गाचे माजी विद्यार्थी असलेलं वोहरा जगातील सर्वोत्कृष्ट विचारवंतांमध्ये गणले जातात.

वोहरा यांची शिक्षणाची पार्श्वभूमी आदर्शवत आहे. त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि सॉर्बोन युनिव्हर्सिटी, पॅरिस यासह भारतातील आणि परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमधून पदवी प्राप्त केली आहे. वोहरा यांनी 1972-73 पर्यंत दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये अध्यापन केले आहे. त्याच्या योगदानाचा सन्मान म्हणून, आर्मेनियाने त्यांना उत्कृष्टतेबद्दल सुवर्णपदक दिले आणि एका शाळेचे नाव त्याच्या नावावर ठेवले. सुदानने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान दिला आणि त्यांना आफ्रिकन जमातीचा ‘प्रिन्स’ बनवण्यात आले होते.

युसूफ मास्टर कार्यक्रमाचे मॉडरेटर असतील तर या प्रकल्पाचे संचालक प्रवीण पंचभाई आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, परंतु पूर्व नोंदणीवर प्रवेश दिला जाईल. नोंदणीसाठी, कृपया vmanagpur.org ला भेट द्या किंवा 7888029862 वर संपर्क साधा. इच्छुकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्हीएमएचे अध्यक्ष महेंद्र गिरीधर यांनी केले आहे.

- Advertisment -