पत्रकार तिलकचंद टेंभूर्णे यांना मातोश्री शोक
नागपूर : शांताबाई सखाराम टेंभूर्णे (८५) यांचे निधन झाले. पत्रकार तिलकचंद टेंभूर्णे यांच्या त्या मातोश्री आहेत. मंगळवार ( २८ फेब्रुवारी) रोजी त्यांच्या भानखेडा येथील निवासस्थाना वरुन दुपारी १ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.
त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. लता मंगेशकर रुग्णालय येथे त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. वैशाली निर्वाणघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. IBMTV9 NEWS च्या वतीने शांताबाई सखाराम टेंभूर्णे यांना भावपूर्ण श्रद्धांजली🏵️🏵️🏵️


