सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते होणार ‘वार’ यंत्राचे लोकार्पण गुरुवारी

सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते होणार ‘वार’ यंत्राचे लोकार्पण गुरुवारी

कान्होलीबारा येथील आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्कमध्ये आणखी एका यंत्राचा जिज्ञासूंना घेता येईल लाभ

नागपूर : आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्क, श्री क्षेत्र चक्रवर्ती नगरी चौकी कान्होली बारा हिंगणा नागपूर येथे, नवनिर्मित ‘वार’

यंत्राचे उद्घाटन सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांच्या हस्ते गुरुवार दिनांक २ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. याप्रसंगी प्रामुख्याने कोठा जयपाल रेड्डी, उद्योजक व समाजसेवक करिम नगर तेलांगना, बिरदविंदर सिंग शम्मी सिद्ध पटियाला, डॉ प्रमोद पडोले डायरेक्टर VNIT, प्रोफेसर दिलिप पेशवे व त्यांचे या यन्त्रावर काम करणारे प्रोफेसर टिम हे प्रामुख्याने उपस्थित राहतील.

श्री क्षेत्र चक्रवर्ती नगरी चौकी कान्होलीबारा येथे आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्क व श्री शनिशक्तीपीठाची स्थापना जून २०१९ साली करण्यात आली आहे. या पूर्वी या ठिकाणी प्रामुख्याने मध्य भारतातील सर्वात मोठे सूर्य घड्याळ (सन डायल) यासोबतच ३३०० किलो वजनाचे भारतातील सर्वात मोठे चार फूट रुंद, आणि चार फूट लांब बसाल्ट दगडावर कोरलेले श्रीयंत्र, अचूक कालनिर्णय दाखवणारे भारतातील पहीले तिथी यंत्र व नक्षत्र यंत्र यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

या परिसरात पवित्र व स्कंध पुराणात वर्णित गुरु बृहस्पती परिक्षेत्रात नव्याने ‘वार यंत्राची निर्मिती करण्यात आली असून त्याचे लोकापर्ण सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे.

या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आचार्य भूपेश गाडगे यांनी केले आहे. या यंत्रांचा जिज्ञासूंनी लाभ घेण्याचे आवाहन ते करतात. हे यंत्र वैदिक खगोलशास्त्रांच्या आधारे निर्मित केले असून, भारतामध्ये जंतरमंतर जयपूर येथे राजा जयसिंग यांनी कालगणनेची जी अचूक वेधशाळा (ऑब्जर्वेटरी) निर्माण केली आहे त्यानंतरच्या काळात अश्या वेधशाळांचे निर्माण भारतात फार कमी प्रमाणात झाले.

अलीकडच्या काळात रमण विज्ञान केंद्रात या बाबीची घडामोड बघता मात्र त्यात जे शोध दाखविण्यात येतात ते आईस्टाईन किवा न्यूटनचे शोध दाखविले जातात मात्र कान्होलीबारा येथील आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्कमध्ये वैदिक विज्ञानाच्या आधारावर आपल्या ऋषि मुनींनी हजारो वर्षापूर्वी जे संशोधन केले, जे शोध केले, ते दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

प्रामुख्याने जे ‘वार’ यंत्र आहे, रविवार, सोमवार, मंगळवार इत्यादी वारांची माहिती सर्वांना आहे परंतू त्याचं विज्ञान, ते आले कुठून याची माहिती सांगितली जात नाही किवा अभ्यासक्रमात देखील शिकवली जात नाही. सर्व जगात अमेरिका, युरोप, चायना इत्यादी देशात हे अगाध व प्रगाढ ज्ञान जसेच्या तसे वापरल्या जातं परंतू या मागील वैज्ञानिक भूमिका काय आहे, हे लोकांच्या समोर येण्यासाठी ‘वार यंत्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

याच प्रमाणे येथील जे ‘तिथी’ यंत्र आहे ते देखील कालगणनेसाठी सर्वाधिक अचूक असे आहे, हे यंत्र चंद्राच्या भ्रमणानुसार स्थापित करण्यात आले आहे. चंद्राच्या आधारावर जी कालगणेची रचना आपल्या ऋषि मुनींनी केली आहे, त्या बद्दलची माहिती जिज्ञासूंना व्हावी या उद्देशाने या ‘तिथी’ यंत्राची स्थापना करण्यात आली आहे. थोडक्यात वैदांतिक तत्वज्ञान लोकां पुढे यावे ही महत्वाची बाजू लक्षात घेऊनच कान्होली बारा येथील आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्क तयार करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने आचार्य भूपेश गाडगे, डॉ. अनिल वैद्य, आचार्य पूजा गाडगे, रामदास फूलझले महाराज, रमेश मिश्रा, देवेंद्र डायरे, बालकनाथ केपी व सहयोगी परिश्रम घेत आहेत.

- Advertisment -