प्रसारमाध्यमांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे
– पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांचे प्रतिपादन
नागपूर – न्यायपालिका, प्रशासन, कार्यकारी मंडळाच्या कार्याप्रणालीव लक्ष ठेवण्याचे काम पत्रकारांचे असून प्रसारमाध्यमांनी समाजाला दिशा देण्या
चे काम करावे. सध्या पत्रकार अदृष्य बंधनात वावरत आहेत.
परंतु, खरी पत्रकारिता करायची असेल तर पत्रकारांनी बंधने झुगारून वृत्तांकन करायला हवे, असे प्रतिपादन वर्धा येथील जय महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले. ते आज विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मोरभवन येथे आयोजित विदर्भ गौरव पुरस्कार सत्कार समारंभात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

पत्रकाराने एका धारेच्या विचाराने भारवून जाऊ नये. चांगल्या गोष्टीवर विचार आणि वाईट कामावर वार करण्याचे काम पत्रकाराने करावे. पत्रकाराने निष्पक्ष राहून वृतांकन करावे. वकील पैशासाठी जसा कोणत्याही आरोपीचा खटला लढतो, तसी भूमिका पत्रकार घेऊ शकत नाही. व्यवहारिक ज्ञान आणि शुद्ध विचार हे पत्रकारांचे शस्त्र असायला हवे. पत्रकारांनी व्यक्ती परत्वे आपला व्यवहार बदलवू नये. आदर्शाची निर्मिती करण्याचे काम पत्रकाराचे आहे. समाजातील वाईट गोष्टीवर प्रहार करण्याचे काम पत्रकारांचे आहे.

चांगले व्यक्ती आणि चांगले काम करणाऱ्यांचा शोध पत्रकारांनी घ्यावा. पत्रकारामध्ये अहंकार असू नये. तर्क लावून बातमी लिहिण्याचे कसब पत्रकारमध्ये असावे. बोटावर मोजणाऱ्या पत्रकारांनी पत्रकारिता क्षेत्र बदनाम केले आहे. चिंतन हा विषय पत्रकारांचा आहे. प्रतिष्ठा, निष्ठा राखण्याचे काम पात्रकारांनी करावे.

यावेळी विदर्भ गौरव पुरस्काराने जेष्ठ पत्रकार संतोष तायडे, शार्दूर वाघमारे, अभय यादव, योगेंद्र शंभरकर आणि अनिल कांबळे यांना शाल-श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन दर्पण पत्रकार व संपादक फाऊंडेशचे अध्यक्ष सुशील पांडे, सचिव संजय तिवारी, राजेंद्र पाठक, राजेश शुक्ला यांनी केले. तसेच सूरज शर्मा, युगांत उगले, प्रशांत भगत, कोमल शाहू, पूजा शाहू, पूनम इंगोले, विद्या सेलोकर यांचाही सत्कार करण्यात आला.


