सातगावच्या ६०० घरांवर चालणार बुलडोजर, परिवार होणार बेघर !
२० वर्षांपासून वास्तव्यास पण कोर्टाचा दणका !
नागपूर : बुट्टीबोरीला लागून असलेल्या सातगावच्या ६०० घरांवर बुलडोजर चालणार असल्याने वास्तव्यास असलेले गावकरी चिंतेत आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते सातगावात राहतात. मात्र आता कोर्टानेच जागा खाली करण्याचे आदेश दिले असल्याने पीडित रहिवाशी चिंतेत आहेत. टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली कैफियत मांडली. पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ पर्यंत सर्वांचे हक्काचे घर असणार असा नारा दिला होता. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांची डबल इंजीनची सरकार आहे. मोदी समर्थित राज्याची सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यातीलच ६०० घरांवर बुलडोजर चालत आहे.
त्यांचे पुनर्वसन करुन त्यानंतरच ६०० परिवारांच्या घरांवर बुलडोजर चालवायला पाहिजे. अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पीडित कुटूंबीयांनी शिंदे-फडणवीस सरकारला केली आहे. गावच्या सरपंचाचा हा डाव असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांना पीडितांनी निवेदन दिले. मात्र जिल्हाधिकारी यांनी कुठलींच गंभीर दखल घेतली नाही, हे विशेष. कोर्टाचा आदेश असल्याने ते ६०० कुटूंब चिंतेत आहेत. स्थानिक आमदार समीर मेघे यांनीही या प्रकरणाकडे पाठ फिरवली आहे. पत्रकार परिषदेला पीडित गावकरी उपस्थित होते.

