सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

वनविभागाच्या नारा डेपोच्या हरणांचा जीव धोक्यात,  तपासणी नाका कोमात !

वनविभागाच्या नारा डेपोच्या हरणांचा जीव धोक्यात,  तपासणी नाका कोमात !

नागपूर : सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या नारा डेपोतील हरणांचा जीव धोक्यात असून वनउपज तपासणी नाका नंबर १ घाणीच्या साम्राज्यात आहे. त्यामुळे फॉरेस्ट गार्डचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोराडी मार्गावर वनविभागाचा नारा डेपो २१.७५ हेक्टर मध्ये आहे. हा परिसर एफडीसीएम अंतर्गत होता. १९९० पासून वनविभागाच्या ताब्यात आहे. उद्यान म्हणून नारा डेपो घोषित करण्यात आला आहे. मात्र अध्यापही परिसर उद्यानात परिवर्तीत झाला नाही. नारा डेपो येथे २५० ते ३०० हरणांचा कळप वास्तव्यास आहे. या डेपो मध्ये विविध प्रजातिंचे वनस्पती व फळबागांचे उत्पादन केले जाते. डेपोला लागून मानवी वसाहत आहे. हरणांचा कळप जिथे आहे, त्या परिसराला सुरक्षा भिंत नसल्यामुळे हरीण मानवी वसाहती मध्ये प्रवेश करतो. मोकाट कुत्रे हरणांचे लचके पाडतात. कित्येक हरीण मोकाट कुत्र्यांचे शिकार झाले आहेत. त्यामुळे, नारा डेपो परिसरातील हरणांचा जीव धोक्यात असून सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी वन्यप्रेमींची आहे. विशेष म्हणजे, नारा डेपो मध्ये तात्पुरत्या स्वरुपात एक फॉरेस्ट गार्ड, चार वनमजूर, एक वनपाल असा स्टॉप तैनात करण्यात आला आहे.

यालाच लागून वनउपज तपासणी नाका १ टिनाच्या शेड मध्ये आहे. दोन फॉरेस्ट गार्ड महिला कर्मचारी येथे आळीपाळी ने तैनात असतात. मात्र टिनाच्या शेडमध्ये असलेल्या वनउपज तपासणी कार्यालय घाणीच्या साम्राज्यात असल्यामुळे तैनात फॉरेस्ट गार्डचे आरोग्य धोक्यात आले आहे.

विशेष सांगायचे म्हणजे, कार्यालयाचा विकास करण्याबाबत अनेकदा वनाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. मात्र अध्यापही या वनउपज तपासणी नाका १ चा विकास करण्यात आला नाही, हि शोकांतीका आहे. नारा डेपो व वनउपज तपासणी नाक्याचा विकास लवकरात लवकर करण्याची मागणी वन्यप्रेमींणी केली आहे.

- Advertisment -