चॉक्स कॉलनी परिसरात नळावाटे घरात गटारीचे पाणी !
पोटांचा आजार वाढला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मनपाचा OCW विभाग कुंभकरण झोपेत !
नागपूर : चॉक्स कॉलनी परिसरातील अनेक भागांतील नळांच्या पाण्यातून थेट गटारीचे पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पोटांच्या आजाराचे रुग्ण घराघरात असून मनपाचा OCW विभाग कुंभकरण झोपेत आहे. टँकरवरच नागरिक तहाण भागवत असताना OCW पाण्याचे बिल भरण्यासाठी नागरिकांना नोटीस पाठवित आहे.
उत्तर नागपूरातील इंदोरा परिसरा शेजारी चॉक्स कॉलनी परिसर आहे. या भागातील सुरेश मेश्राम ते सुनील बनसोड, कनोजिया ते समीर लाहिरी यांच्या रांगेतील नळाला गेल्या अनेक दिवसांपासून गटारीचे पाणी येत आहे. एकूण १५० घरांना हा त्रास आहे. या भागात अंदाजे ६५ वर्ष जुनी गटार लाईन आहे. तर २० वर्ष व ६ वर्ष जुनी पाण्याची पाईप लाईन आहेत. दोन्ही पाईप लाईन मधून नागरिकांनी नळाचे कनेक्शन घेतले आहे. गटार लाईन जीर्ण झाली असल्याने नळाच्या पाण्यात गटारीचे पाणी मिश्रित होत आहे. त्यामुळे, घरातील नळाला घाण पाणी येत आहे.
त्रस्त नागरिकांनी अनेकदा मनपाच्या OCW विभागाला तक्रार केली. मात्र अध्यापही OCW च्या अधिकाऱ्यांनी नागरिकांचा त्रास गंभीरते ने घेतला नसून उलट OCW च्या अधिकार्यांनी नळाच्या बिलाचा भरणा करण्यासंदर्भात त्रस्त नागरिकांना नोटीस बजावले आहे. चॉक्स कॉलनी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जीर्ण गटार लाईन बदलविण्याची मागणी रवि पटेल, अविनाश मेंढे, विवेक वानखेडे, मेघराज चिंचखेडे, नरेश साखरे, नविन मेंढे, सोनु (सनी) सिंग आदींनी केली आहे.