सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

रविभवन कि कचरा घर !

रविभवन कि कचरा घर !

नागपूर : रविभवन परिसरातील कचऱ्याची उचल नियमित होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रविभवन कि कचरा घर असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. डासांचा प्रकोप वाढला असून ‘साबा’विभागाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे.

रविभवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे’देवगीरी’ शासकीय निवासस्थान आहे. या भागात अंदाजे ३० क्वॉटेज व ७५ रुमची व्यवस्था आहे. मंत्री व अधिकारी हे रविभवन येथे विश्राम करतात. हिवाळी अधिवेशन काळात परिसर चकाचक असतो. अधिवेशनाचे सुप वाजताच परिसराच्या साफ सफाई कडे ‘साबा’ अभियंता कानाडोळा करताना दिसतात.

रविभवन येथे असलेल्या कचरा घरातून नियमित कचऱ्याची उचल होत नसल्याने सर्वत्र घाणच घाण पसरलेली आहे. गटारीचे चेंबर उघडे असल्याने त्यालाही कचरा घराचे स्वरुप आले आहे. ‘साबा’च्या सफाई कर्मचार्‍यांवर’साबा’अभियंत्यांचे वचक नसल्यानेच रविभवन परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी रविभवन परिसराची पाहणी करुण कुंभकरण झोपेत असलेल्या ‘साबा’अधिकार्‍यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी आता सर्वच स्तरावरुण होत आहे.

- Advertisment -