सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

नारायण जोशींच्या ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर ‘चे थाटात प्रकाशन

नारायण जोशींच्या ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर ‘चे थाटात प्रकाशन

नागपूर : लेखक नारायण जोशी यांच्या ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दुर्गा मंदिर देवस्थान, प्रतापनगर येथे पार पडला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी धनंजय ढोक होते तर विदर्भ साहित्‍य संघाचे डॉ.राजेंद्र डोळके, नाटककार प्रभाकर ठेंगडी, धरती अॅग्रो लि.चे झोनल मॅनेजर ओमप्रकाश शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. राजेंद्र डोळके यांनी पुस्तकावर भाष्य करताना जोशी यांचे हे पुस्तक अनलंकृत असून लिखाण पारदर्शी आहे, असे सांगितले. प्रभाकर ठेंगडी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली असून संवेदनशील मनाला विचार करायला लावणारे हे पुस्तक असल्‍याचे प्रतिपादन केले. ओमप्रकाशजी शुक्ला यांनी लेखकाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय ढोक यांनी नातेसंबधांवर भाष्‍य केले. आजकाल ‘हम दो हमारा एक’ मुळे अनेक नातेसंबंध उमलत्या पिढीला समजत नाही. त्यामुळे नात्यातील भावनिकतेची फार मोठी हानी झाली आहे,असे प्रतिपादन केले. नारायण जोशी यांनी मनोगत व्‍यक्‍त करताना हल्ली नातेवाईक ही संस्था क्षीण झाली असल्यामुळे समाजाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.नातेसंबंधातील वीण घट्ट झाल्यास सुदृढ समाज निर्माण होईल असे समर्थन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवयित्री रेखा शुक्ला यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत प्रशांत जोशी, अंजली जोशी यांनी केले. या कार्यक्रमाला दुर्गामंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्याम काळे, विश्वस्त विजयराव पडोळे, साहित्य परिषदेचे अविनाश पाठक, चंद्रकांत रोडी,वर्षा देशपांडे, ज्योती पुप्पुलवार, राहुल व मोना ठेंगडी,शिवशलाका स्वरा ठेंगडी,रंजना व्याघ्रळकर,मोहन ढोक,मंजु डांगे,शैलजा पळसोकर,सरोज अंदनकर सहित जोशी कुटुंबिय उपस्थित होते. सुप्रसिद्ध गायिका छाया वानखेडे यांनी शारदास्तवन व पसायदानाने सादर केले.

- Advertisment -