सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

लघुवेतन कॉलनी येथे आमदार डॉ. नितीन राऊत उभारणार अत्याधुनिक वाचनालय व ग्रंथालय !

लघुवेतन कॉलनी येथे आमदार डॉ. नितीन राऊत उभारणार अत्याधुनिक वाचनालय व ग्रंथालय !

लघुवेतन कॉलनीच्या संचालक मंडळाशी केली अर्धा तास चर्चा

नागपूर : उत्तर नागपुरातील युवकांचा बौद्धिक विकास व्हावा व ते उच्च शिक्षण घेऊन ‘सुपर क्लासवन’ऑफिसर बनावेत. असा संकल्प क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी केला आहे. त्यांच्या याच संकल्पनेला लक्षात घेऊन लघुवेतन कॉलनीच्या संचालक मंडळाने राऊत यांची भेट घेतली. तसेच, परिसरातील समाजभवन येथे वाचनालय व ग्रंथालय उभारुन देण्यासंदर्भात निवेदन दिले.

लघुवेतन कॉलनी येथे १९९ प्लॉट धारक वास्तव्यास आहेत. या वसाहतीची एकूण लोकसंख्या अंदाजे दोन हजारांच्या घरात आहे. येथील कित्येक विद्यार्थी अभ्यास करायला राममनोहर लोहिया वाचनालय, कस्तुरबा वाचनालय, बाजीराव साखरे वाचनालय येथे अभ्यास करायला जातात. परिसरातच जर वाचनालय व ग्रंथालय असले तर अनेकांना त्याचा फायदा होईल, अशी भावना काही मुलांनी व वयोवृद्धांनी व्यक्त केली आहे.

आमदार डॉ. नितिन राऊत यांनी लवकरात लवकर दोन मजली इमारत उभारुण वाचनालय व ग्रंथालय बांधून देणार असल्याचे आश्वासन दिले. गटार लाइन व इतरही समस्यांवर यावेळी राऊत यांच्याशी चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात लघुवेतन कॉलनीचे अध्यक्ष महेन्द्र राऊत, सचिव प्रभाकर मात्रे, कोषाध्यक्ष चंद्रपाल कवाडे, जनार्धनसिंह रवानी, विजय कराडे, अभिषेक कोकोडे, तत्वशील घोडेस्वार, भीमराव लोणारे आदी उपस्थित होते.

- Advertisment -