सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

वृक्षारोपण आणि रोपटी वाटप करत नागपूर मेट्रोने साजरा केला पर्यावरण दिन

वृक्षारोपण आणि रोपटी वाटप करत नागपूर मेट्रोने साजरा केला पर्यावरण दिन

नागपूर : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देशात सर्वत्र कार्यक्रम साजरे होत असताना, नागपूर मेट्रोने देखील या संबंधाने विविध उपक्रम राबवलेत. ग्रीन मेट्रो अशी ओळख असलेल्या नागपूर मेट्रोने आज शहरातील लिटील वूड येथे वृक्षारोपण केले. तसेच सर्व सामान्य जनतेला पर्यावरण दिनाचा संदेश देत मेट्रो स्थानकांवर प्रवाश्यांना रोपटी देखील भेट दिलीत.

पर्यावरण रक्षणाकरता कायम तत्पर असलेल्या नागपूर मेट्रोने शहरातील लिटील वूड येथील अर्बन फॉरेस्ट येथे वृक्षारोपण केले. अमलतास, बकुळ अश्या विविध प्रजातीची रोपटी लावत लिटील वूडला अधिक अधिक हिरवेगार करण्याचा प्रयत्न केला. महा मेट्रो तर्फे संचालक (प्रकल्प) श्री राजीव त्यागी आणि इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यकमात सहभागी झाले होते.

वृक्षारोपणा सोबतच नागपूर मेट्रो तर्फे रोपटी वाटपाचा उपक्रम देखील राबवण्यात आला. नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज, एयर पोर्ट, खापरी आणि लोकमान्य नगर मेट्रो स्थानकांवर रोपटी वाटपाचा कार्यक्रम झाला. कडूनिंब, पिपळ, सीताफळ, जांभूळ, पेरू, आंबा, जास्वंद, आवळा, कवठ अश्या पर्यावरण पूरक रोपट्यांचे वाटप महा मेट्रो तर्फे प्रवाश्यांना या प्रसंगी करण्यात आले.

- Advertisment -