सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

गर्भलिंग निदान केंद्र उघडताना नियमांचे पालन करा तरच मिळणार परवानगी : डॉ. राठोड

गर्भलिंग निदान केंद्र उघडताना नियमांचे पालन करा तरच मिळणार परवानगी : डॉ. राठोड

जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतला आढावा

नागपूर : गर्भलिंग निदान केंद्र सुरू करताना शासनाने गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यात (पीसीपीएनडीटी ) केलेल्या तरतूदीप्रमाणे आवश्यक परिपूर्ती अनिवार्य आहे.

त्यामुळे जिल्ह्यात परवानगी देताना या सर्व निकषाची परिपूर्तता करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी आज येथे केले. शासनाच्या गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. आज या बैठकीमध्ये एकूण 32 प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.

यामध्ये नव्याने नोंदणी, पुनर्स्थापना, नाव वगळणे कमी करणे, केंद्राची जागा बदलणे व अन्य प्रस्तावांचा समावेश होता. नव्या प्रस्तावापैकी फक्त एका प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली. यामध्ये आवश्यक दस्तावेज पुन्हा सादर करण्याची सूचना करण्यात आली. अन्य अपूर्ण नऊ प्रकरणांमध्ये दस्ताऐवज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनात या समितीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली खेडीकर, डॉ.माधुरी थोरात, डॉ.संजय करपाते, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी देवेंद्र क्षिरसागर, अमृता जोशी, गौरव वरखेडे, ॲड. आनंद भिसे उपस्थित होते.

- Advertisment -