सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मविआच्या काळात ट्रोलिंग करणाऱ्यांवर कारवाई !

मविआच्या काळात ट्रोलिंग करणाऱ्यांवर कारवाई !

चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
 

भाजपा व नेतृत्त्वाला बदनाम करण्याचा डाव

शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचे समर्थन कदापि शक्य नाही, त्यावर कारवाई होणारच. परंतु, मविआच्या सरकारच्या काळात व्यक्तिगत देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करण्यात आले, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मविआच्या अडीच वर्षांचा रेकॉर्ड काढून वाईट लिहिणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडीच वर्षे सरकारमध्ये असताना त्यांच्या वॉररूमधून फडणवीसांची बदनामी केली, त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट शब्दात लिहिण्यात आले. व्यक्तिगत आक्षेपार्ह लिखान झाले. दुसरीकडे सौरभ पिंपळकरने शरद पवार यांना धमकीच दिलेली नाही. तरीही त्याचे भांडवल करण्यात येत असून भाजपा व महाराष्ट्राच्या नेतृत्त्वाला बदनाम केले जात आहे. रावसाहेब दानवे आणि माझ्यासोबतची त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करून संबंध जोडला जात आहे. जी कथित धमकी देण्यात आली आहे ती वेगळ्या फेकबुक अकाऊंटवरून आहे.

सौरभ पिंपळकर अमरावतीचा भाजपा कार्यकर्ता आहे. कोणाचा कार्यकर्ता असणे ही चूक नाही. कालपासून शरद पवारांबद्दल नरेटिव्ह सेट केल्या जात आहे. पिंपळकरने दुसऱ्याच्या अकाऊंटला फॉलो करीत रिट्विट केले. पण त्या संपूर्ण रिट्वीटमध्ये शरद पवार यांना कुठेही धमकी देणे असा कुठेही उल्लेख नाही. अशा गोष्टींचे आम्ही समर्थन करीत नाही. शरद पवार यांना कोणी धमकी दिली तर महाराष्ट्र सहन करणार नाही आणि फडणवीस सहन करणार नाही, असेही श्री बावनकुळे म्हणाले.

तर उद्वव ठाकरे दोन जागा लढवतील

उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. महाविकास आघाडीत त्यांना दिल्या तेवढ्या जागांवर समाधान मानून घ्यावे लागेल. उद्धव ठाकरेंच्या जागांवर काँग्रेस दावा करणार आहे. रामटेकची जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे पण त्यावर आता कॉंग्रेस दावा करीत आहे. उद्धव ठाकरे यांना दोन जागांवर समाधान मानावे लागेल. उद्धव ठाकरे यांना भाजपानेच मोठ्या भावाचा दर्जा दिला. एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वात ५० आमदार बाहेर पडले नसते तर राष्ट्रवादी कॉंग्रेस सुप्रीया सुळेंना मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या विचारात होते, असेही श्री बावनकुळे यांनी सांगितले. मविआचे सरकार असते तर राष्ट्रवादीच्या १०० आणि शिवसेनेच्या २० जागा निवडून आल्या असत्या.

कल्याणचा वाद स्थानिक कार्यकर्त्यांचा

कल्याणमधील प्रकरण हे स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रश्न असल्याने त्यातून वाद झाला आहे. मी स्वत: त्यामध्ये लक्ष घालणार असून रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलणार आहे. यातून मार्ग निघेल असे ते म्हणाले. मी बैठक घेऊन तोडगा काढणार आहे. निवडणूक कोणता उमेदवार लढणार हे ठरविण्याचा अधिकारी भाजपाच्या केंद्रीय संसदीय समितीला आहे, कार्यकर्त्यांना नाही.

- Advertisment -