सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मराठी चित्रपट ‘झुरका’च्या निर्मात्याने केली वीजेची चोरी !

मराठी चित्रपट ‘झुरका’च्या निर्मात्याने केली वीजेची चोरी !

कोराडी महादुला परिसरात सुरु आहे ‘झुरका’चित्रपटाचे चित्रिकरण

भाजपचा बडा नेता व महादुला नगर पंचायतीचा नगर अध्यक्ष आहे चित्रपट निर्माता

कोराडी : मराठी चित्रपट ‘झुरका’च्या निर्मात्याने चक्क वीजेची चोरी करुन चित्रपटाचे चित्रिकरण केले आहे. कोराडी महादुला येथे या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असून ‘हाय होल्टेज’ डिपी मधून वीजेची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चित्रपट निर्माता महादुला नगर पंचायतीचा नगर अध्यक्ष असल्याची सुत्राची माहिती आहे.

प्राप्त माहिती नुसार, नगर पंचायत महादुला अंतर्गत ‘झुरका’ या मराठी चित्रपटाचे चित्रिकरण सुरु आहे. कुठल्याही चित्रपटाचे चित्रिकरण करायचे असेल तर संबंधित जे विभाग असतात, त्यांची ‘एनओसी’ घेणे अनिवार्य असते. मात्र ‘झुरका’ या चित्रपटाच्या निर्मात्याने महावितरण विभागाची ‘एनओसी’ न घेताच ‘हाय होल्टेज’ डिपी मधून वीजेची चोरी केली. गेल्या चार दिवसांपासून महादुला नगर पंचायत अंतर्गत या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असल्याची सुत्राची माहिती आहे.

चित्रपट निर्माता हा भाजपचा बडा नेता व नगर पंचायत महादुलाचा नगर अध्यक्ष आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चित्रपट निर्माता निकटवर्ती मानल्या जातो. त्यांच्या आशीर्वादानेच नियमबाह्य काम व महावितरणच्या तिजोरीला तडा पोहचविण्याची हिम्मत ‘झुरका’ चित्रपटाच्या निर्मात्याने केली आहे. एखाद्या गरीबाने वीजेची चोरी केली तर त्याला दम देऊन दंड वसूल केला जातो. चित्रपट निर्माता यांच्यावर काय कारवाई केली, हे जाहिर पणे स्पष्ट करण्याची मागणी आता महावितरण विभागाला होत आहे. विशेष सांगायचे म्हणजे, घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी निर्माता यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला. मात्र होऊ शकला नाही. 

महावितरण विभागाने कारवाई केली

या घटनेसंदर्भात महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता खवसे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी महादुला नगर पंचायतीकडे चेंडू फेकला. महादुला नगर पंचायतीने चित्रपट निर्मात्याने वीज चोरी केल्याची तक्रार करायला हवी होती. त्यांनी तशी तक्रार केली नाही. घटनेची माहिती मिडियाच्या माध्यमातून कळली असून कारवाई महादुला नगर पंचायतीवर करणार असल्याचे खवसे यांनी सांगितले.

चित्रपटाचे चित्रिकरण करण्याची ‘एनओसी’ दिली

महादुला नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी धाबर्डे मॅडम यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे घटनेसंदर्भात विचारणा केली असता त्या म्हणाल्या, आम्ही चित्रपटाचे चित्रिकरण करण्याची ‘एनओसी’ दिली आहे. महादुला नगर पंचायत अंतर्गत जवळपास शंभराच्या घरात विद्युत डिपी आहेत. वीजेची चोरी करणाऱ्यांवर महावितरण विभागाने कारवाई करावी. नगर पंचायतीचा यात कुठलाही रोल नाही.

- Advertisment -