सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

नऊ हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक व पर्यवेक्षिकेला अटक !

नऊ हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक व पर्यवेक्षिकेला अटक !

महात्मा गांधी इंग्लिश शाळेतील घटना

नागपूरः पाचव्या वर्गात प्रवेश देण्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच माघणाऱ्या महात्मा गांधी इंग्लिश शाळेतील (विनाअनुदानित) लाचखोर मुख्याध्यापिका व पर्यवेक्षिकेला ‘एसीबी’च्या पथकाने शनिवारी रंगेहाथ अटक केली.

डायना अलेक्झांडर अब्राहम (३६) रा. मार्टिन नगर (मुख्याध्यापिका) व रेखा हर्षवर्धन मोहिते (६२) रा. गायत्री नगर, झिंगाबाई टाकळी (पर्यवेक्षिका) अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत. एसीबी द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पाचपावली येथील एका ३८ वर्षीय महिलेला तिच्या मुलांच्या शंभर टक्के अनुदानित शाळेत प्रवेशासाठी लाच मागितली. अनुदानित शाळेत प्रवेश मिळाल्यावर पुढे शुल्क लागणार नसल्याचे सांगितले.

महिलेला लाच द्यायची नसल्याने तिने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्यानुसार महिला जरीपटका येथील महात्मा गांधी इंग्लिश स्कूल, येथे पोहोचली. येथे तिने लाचेचे ९ हजार रुपये विनाअनुदानित शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या डायना अलेक्झांडर यांच्या हातात दिले. त्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. ही माहिती कळताच तेथे खळबळ उडाली.

या शाळेत अनुदानित आणि विनाअनुदानित अशा दोन वेगवेगळ्या तुकड्या आहेत. अनुदानित वर्गात विद्यार्थ्यांना शुल्क लागत नाही. तर विनाअनुदानित वर्गात शुल्क लागते. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, पोलीस उपनिरीक्षक महेश चाटे, पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्वात शिवशंकर खेडेकर, नितीन बलिगवार, राम शास्त्रकर, करुणा सहारे, कांचन गुलबसे, अस्मिता मल्लेरवार यांनी केली.

- Advertisment -