सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सेवा सुशासन प्रगती पत्रकाचे घरा घरात वाटप !

सेवा सुशासन प्रगती पत्रकाचे घरा घरात वाटप !

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याचे औचित्यसाधून उत्तर नागपूर येथील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या पंचशील नगर परिसरात सेवा सुशासन प्रगती पत्रकाचे घरा घरात वाटप करण्यात आले. उत्तर नागपुरचे प्रमुख भाजपचे शहर मंत्री अविनाश धमगाये यांच्या नेतृत्वात उपरोक्त अभियान राबविले जात आहे.

नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात तरुणांसाठी ३९० विश्वविद्यालय, ७ आयआयटी व आयआयएमची स्थापना करण्यात आली. नवीन २२५ मेडिकल कॉलेज शाळांचा विकास आणि उदय तरुणांच्या हातांना काम मिळाव म्हणून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना किंवा महिलांकरिता सशक्तीकरण अभियाना अंतर्गत उज्वला गॅस योजना प्रधानमंत्री मुद्रा लोन मातृ वंदन योजना, मुद्रा लोन योजना, असो किंवा जन आरोग्याच्या निमित्याने आयुष्यमान भारत योजना, कोरोना काळात वॅक्सिनेशन अभियान , नागपूर शहरात वाढत्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याकरिता संपूर्ण शहर मेट्रो मय करण्यात आले .देशपातळीवर भारत अखंड राहावं म्हणून जम्मू काश्मीर या राज्यात ना 370 कलम हटविण्याचा काम, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भारताची सुरक्षा मजबूत करण्याचं काम, देशात नवीन विमानतळ उभारण्याचे काम, श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण करणे, राष्ट्रीय युद्ध स्मारक दिल्लीला स्थापन करणे इत्यादी लोकप्रिय कार्य नव ९ वर्षांच्या कालखंडात नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे.

उत्तर नागपूरच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग संपूर्ण नागपूर शहरात तच नव्हे तर देशात आणि देशाबाहेर सुद्धा आहेत याची जाण महाराष्ट्र सरकारला असल्याने राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय पातळीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरची उभारणी करून लोकार्पण करण्यात आले. उत्तर नागपूर येथे शिक्षित नवतरुणांना उच्च शिक्षणाकरिता अभ्यासाची सोय व्हावी म्हणून विद्यार्थ्यांकरीता नागपूर महानगर पालिकचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाजीराव जी साखरे यांच्या नावे लष्करीबाग येथे ई लायब्ररी ची स्थापना करण्यात फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. नामांतर शहिदांच्या प्रति आपली श्रद्धा व्यक्त करण्याकरिता नामांतर शहीद स्मारकाची निर्मिती, वैशाली नगर प्रभाग 10 येथे बाबासाहेब आंबेडकर निर्मिती आणि सौंदर्यकरण , पवित्र दीक्षाभूमी ला शासनाच्या वतीने करोडो रुपयाचा निधी देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करून दिलेला आहे.

उत्तर नागपुरातील दिन ,दलित ,मजूर यांना स्वतःच घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना, आणि इतर योजना चे परिपत्रक घर चलो अभियाना अंतर्गत पंचशील नगर , आदर्श नगर, खोब्रागडे नगर, राणी दुर्गावती चौक या ठिकाणी वाटप करण्यात आले.

यासेवा सुशासन किंवा घर चलो अभियानाला भाजप नेते भोलानाथ सहारे, अविनाश धमगाये, मंडळाचे महामंत्री गणेश कांतोडे, प्रभाग संयोजक दिनेश कुकडे, वामन लांजेवार, यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. यात बूथ क्रमांक 346 ,347 ,348 चे बूथ प्रमुख ,शक्ती केंद्र प्रमुख मीनाताई फाले, सागर खोब्रागडे, आनंद अंबादे, चैत्राम हरोडे ,शकुंतला बागडे, विनोद गवई, गुरमीत सिंग बावरी ,कुंभलवार, प्रवीण राऊत आदी उपस्थित होते.

- Advertisment -