सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

नागरिकाना पायी चालण्यासाठी फुतपाथ उरलेच नाही !

नागपूर – शहरात नागरिकांना पायी चालण्यासाठी महापालिकेने फुटपाथ बांधले आहे, पण नागरिकाना पायी चालण्यासाठी फुतपाथ उरलेच नाही, प्रताप नगर चौकात फळविक्रेत्यानी फुटपाथ गिळकृत केले आहे, महापालिकेचा वचक नसल्यामुळे फुटपाथवर अतिक्रमण करणार्या फळविक्रेत्यांची दादागिरी वाढली आहे.

हे अतिक्रमण त्वरीत हटविण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी महापालिकेकडे केली पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येत्या आठ दिवसात प्रताप नगर चौकातील फुटपाथ वरील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक , माजी नगरसेवक प्रकाश तोतवाणी यांनी केली आहे.

प्रतापनगर चौकातील फुटपाथ वर अतिक्रमण असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला, वृद्धांना पायी जाता येत नाही, सचिन मेडिकल, अपोलो मेडिकल स्टोअर्स मध्ये वृद्धांना औषध ह्यामला जायचे असेल तर रस्त्यावरून जावे लागले त्यामुळे अपघात या स्थळावर वाढले आहे. माटे चौक ते प्रताप नगर चौक या सिमेंट रस्त्यावर दोन्ही बाजूंनी पावभाजी, पकोडे, फळवाल्यांनी फुटपाथ संपूर्णता गिळकृत केले आहे, महापालिके कडे वारंवर तक्रारी करून कारवाई केली जात नाही.

महापालिकेचे अधिकारी नागरिकांचे सेवक आहे की फुटपाथ वाल्याचे सेवक आहे असा प्रश्न विचारल्या जात आहे, लक्ष्मी नगर झोनचे सहायक आयुक्त मिलींद मेश्राम यांच्या कडे तक्रार केल्यानंतर ही अतिक्रमण धारकांवर कारवाई होत नाही, प्रताप नगरच्या ज्येष्ठ नागरिकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या कडे तक्रार केली आहे.

उपमुख्य मंत्र्याचे कार्यालय प्रतापनगर चौकातील नक्षत्र हॉल मध्ये आले आहे, यामुळे तरी ज्येष्ठ नागरिकांना चालायला फुटपाथ मोकळे होतील अशी आशा होती पण मग्रुर महापालिकेच्या अधिका-यामुळे अतिक्रमण धारकांना पाठिंबा मिळत आहे, ज्या लोकांच्या घरा समोरील फुटपाथ वर अतिक्रमण आहे त्यांना महापालिकेने नोटीस द्यायला हवी , काही ठिकाणी दुकानदार किंवा घरमालक हॉकर्स कडून पैसे घेवून हात ठेले लावायला परवानगी देत आहे, सारस्वत बॅकेच्चा बाजूला तर पकोडे वाल्याचा ठेला फुटपाथवर आहे.

त्यांच्या कडे येणारे ग्राहक समोर आपली वाहने लावत असल्यामुळे ३० फुटाचा रस्ता १५ फुलाचा झाला आहे, महापालिके कडून फुटपाथवरील अतिक्रमण निघत नसेल तर त्यांनी फुटपाथ च काढून टाकावे जेणे करून रस्ता मोठा होईल व नागरिकांना वाहने पार्क करून पायी चालता येईल. महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांनी संयुक्त मोहिम राबविली तर अतिक्रमणाची कारवाई सुलभ होवू शकते, नागपुरचे खासदार नितीन गडकरी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -