सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

समृद्धी महामार्गाने घेतला २५ जनांचा बळी !

समृद्धी महामार्गाने घेतला २५ जनांचा बळी !

नागपुरहून पूणे कडे जाणाऱ्या खासगी बसचा अपघात 

बस मध्ये होते ३३ प्रवाशी

बुलढाणा : विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी बसचा समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा पिंपळखूटा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ८ प्रवाशी बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. नागपूरहून पूणेला हि खासगी बस जात होती. 

प्राप्त माहितीनूसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करीत होते. बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला.

या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी जखमी आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे.

दररोज किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहे. परिवहन विभागाकडून अपघात रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही. समृद्धी महामार्गावर अपघात का होत आहेत याचा शोध प्रशासनाने घेण्याची गरज आहे. या महामार्गावर कुठल्याच प्रकारची उपाययोजना नसल्याने जखमी देखील वेळेवर उपचार मिळत नसल्याने मृत पावतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट दिली. सरकारच्या वतीने मृतकांच्या नातेवाईकांना ५ लाख व पंतप्रधान निधीतून २ लाख रुपय देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याघटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -