सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

संकल्प एकवीस पारायण समूहाचा मुखोद्गत पारायण उत्साहात

संकल्प एकवीस पारायण समूहाचा मुखोद्गत पारायण उत्साहात

नागपुर : संकल्प एकवीस पारायण समूहाचा श्री. गजानन महाराज विजय ग्रंथ  मुखोद्गत पारायण मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती सभागृहात या मंगल समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. .

अलोने ताई यांच्या हस्ते सकाळी 6.30 ते 7.30 यावेळेत महाराजांचा अभिषेक करण्यात आला. उच्च विद्या विभुषीत व मुखोद्गत पारायण कर्त्या विद्याताई पडवळ यांच्या अमृतवाणीतून मुखोद्गत पारायण करण्यात आले. तत्पूर्वी उदय जोशी यांनी रांगोळी मधून श्री. गजानन महाराजांची प्रतिमा साकारुन भक्तांचे लक्षवेधले.

अपर्णाताई खोडे व चिरंजीव ॠग्वेद खोडे यांच्या भजनाने गजानन भक्त मंत्रमुग्ध झाले. सदैव हसतमुख असलेल्या विद्याताईंचे मुखोद्गत पारायण, श्री. गजानन महाराज विजय ग्रंथाचे गाढे अभ्यासक सुनिल देशपांडे यांची प्रार्थना या सर्वांनी प्रत्येकाच्या अंतर्मनाचा ठाव घेतला. मुखोद्गत पारायणाचा समारोप होताच सायंकाळी 4.30 वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

आकोट, अकोला, तेल्हारा, खामगांव, अमरावती व नागपूर जिल्ह्यातील कान्याकोपऱ्यातून गजानन महाराजांचे भक्त सोहळ्यात सहभागी झाले होते. कार्यक्रमा दरम्यान गोवर्धन गोठकडे माऊली व श्रीपतराव बिहाडे माऊली यांच्या हस्ते मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सोहळ्याचे संचालन  दिगंबर चिकटे माऊली यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता सुभाष झंवर, संजय देशमुख, प्रफुल्लजी जक्कनवार, सौ.उषाताई राखडे, .सौ.वर्षाताई बढिये, सौ.अरूणाताई गवळी, सौ.अपर्णाताई खोडे आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -