सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला विकास कामांचा आढावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला विकास कामांचा आढावा

नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. मंत्री महोदयांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला आमदार मोहन मते, महा मेट्रोचे एमडी नितीन करीर, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये विशेषत्वाने मेट्रो स्थानकांवरील सोयीसुविधा, फिडर बसेस, पावसामुळे उद्भवणारे प्रश्न आदींचा आढावा घेण्यात आला. तसेच आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागपूरकरांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घेण्यासही ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

तसेच एम्स, मिहान, मेडिकल आणि मेयो यासारख्या ठिकाणांवर येण्यासाठी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांकरिता फिडर बसेस वाढविता येतील का, याचाही विचार करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी मेट्रो प्रशासनाला दिल्या. फुटाळा येथील पार्किंग व फुड प्लाझाच्या कामाचीही माहिती ना. श्री. गडकरी यांनी घेतली. देखभाल दुरुस्ती, तिकीट शुल्क, पार्किंग शुल्क आदींच्या बाबतीत येत्या काही दिवसांमध्ये चर्चा करण्यासही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यामध्ये नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले।

- Advertisment -