सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

अनुसूचित जातीच्या विकासासाठी बार्टी कटीबद्ध : सुनील वारे,महासंचालक बार्टी

अनुसूचित जातीच्या विकासासाठी बार्टी कटीबद्ध : सुनील वारे,महासंचालक बार्टी

बार्टीच्या महासंचालकांची दीक्षाभूमीसह विविध ठिकाणी भेट व बैठक

नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे महासंचालक सुनील वारे, यांचा नागपूर येथे दौरा झाला.नागपूर येथे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुरू करण्यासाठी या दरम्यान त्यांनी सामाजिक न्याय भवन येथे पाहणी केली.त्याचप्रमाणे या दौऱ्याची सुरवात दीक्षाभूमी येथे अभिवादन करून केली. दीक्षाभूमी परिसरात असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर येथील कार्यालयाचा त्यांनी आढावा घेतला.बैठकीस गोरक्ष खाडिलकर (अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर),सुरेंद्र पवार (उपायुक्त तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर),श्रीमती आशा कवाडे (संशोधन अधिकारी) व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर येथील अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आला.सुनील वारे यांनी यावेळी विविध योजना व उपक्रम राबविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. महासंचालक यांची प्रथमच नागपूर येथे भेट असल्याने सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याऱ्या विविध संस्था व संघटना यांनी यानिमित्ताने त्यांची भेट घेऊन सत्कार केला.

नागपूर स्थित चिंचभवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्ट येथे वारे यांनी भेट दिली.तेथे सुरू असलेल्या कामाची व उपक्रमाबाबत माहिती घेतली.

संपूर्ण कार्यक्रमात गोरक्ष खाडिलकर ( अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळनी समिती नागपूर),अनिल कारंडे ( उपजिल्हाधिकारी तथा विभागप्रमुख बार्टी पुणे),सुरेंद्र पवार (उपायुक्त तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळनी समिती नागपूर),डॉ.सिद्धार्थ गायकवाड ( प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण नागपूर),तसेच कीशोर भोयर ,जिल्हा समाजकल्याण अधिकारी ,महेश गवई (प्रकल व्यवस्थापक,बार्टी, पुणे) व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -