सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करा: आयुक्त बिदरी

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करा: आयुक्त बिदरी

नागपूर : विभागात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्यात.

विभागीय आयुक्त कार्यालया च्या सभागृहात नागपुर विभागातील पूर परिस्थिती, अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या नुकसानी संदर्भात श्रीमती बिदरी यांनी आढावा घेतला, त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपायुक्त राजलक्ष्मी शाह, महसूल युक्त उपायुक्त दीपाली मोतियाळे दूरदृष्य प्रणालीद्वारे संजय मीणा (गडचिरोली), राहुल कर्डिले(वर्धा), चिन्मय गोतमारे (गोंदिया), योगेश कुंभेजकर (भंडारा), विनय गौडा (चंद्रपूर) उपस्थित होते.
श्रीमती बिदरी यांनी आपत्तीग्रस्तांना प्रशासकीय यंत्रणेकडून वेळेवर मदत मिळेल याबाबत खात्री करून घेण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, अमृत सरोवरस्थळी वृक्षारोपण व पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करणे तसेच अनुकंपा पदभरती लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

- Advertisment -