सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मीडिया कॅरम स्पर्धेत कुणाल राऊतला दुहेरी विजेतेपद

मीडिया कॅरम स्पर्धेत कुणाल राऊतला दुहेरी विजेतेपद

नागपूर : पत्रकार क्लब आॅफ नागपूर आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूर (एसजेएएन) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मीडिया कॅरम स्पर्धेत कुणाल राऊतने पुरुष एकेरी व दुहेरी गटात विजेतेपद पटकाविले.

सिव्हिल लाइन्स येथील प्रेस क्लबमध्ये रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात कुणालने विजय ठाकूरला २५-६, २५-७ ने पराभूत केले. नसीम शेखने संदीप गाडगेला २५-० ने नमवून तिसरे स्थान प्राप्त केले.

पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात कुणाल व विनोद सूर्यवंशी या जोडीने भीमराव लोणारे व सुभाष शर्मा या जोडीला २५-६ ने पराभूत केले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतील विजय ठाकूर व गिरीश ठाकरे या जोडीने परितोष प्रामाणिक व नसीम शेखला २३-११ ने पराभूत केले.

पत्रकार क्लबचे सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर, सचिव परितोष प्रामाणिक, कोषाध्यक्ष नीलेश देशपांडे व स्पर्धेचे संयोजक चारुदत्त कहू उपस्थित होते. संचालन व आभारप्रदर्शन नरेश शेळके यांनी केले.

- Advertisment -