उपराजधानी नागपूरात १७ वर्षिय तरुणाचा खुन !
नागपुर: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपराजधानी नागपुरात दिवसें दिवस क्राईम वाढतानाच दिसत आहे. हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत डोंगरगाव परिसरात एका १७ वर्षिय तरुणाची हत्या करण्यात आली. सक्षम कैलाश तिनकर असे मृतक तरुणाचे नाव आहे.
सौरभ उर्फ बादशाह पंधरामसह व त्याच्या सात साथिदारांनी मिळून सक्षम याचा खुन केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवार (२८ ऑगस्ट) रोजी आरोपींनी सक्षमला रॉड व तीक्ष्ण शस्त्रांनी मारहाण केली होती. सक्षमचा एम्स येथे उपचार सुरु असताना मध्यरात्री नंतर सक्षमचा मृत्यू झाला.
घटना अशी की आरोपी सौरभ उर्फ बादशाह पंधरामसह याच्या सोबत मृतक सक्षमचे भांडण झाले होते. भांडण सेटलमेन्ट करण्याच्या बहाण्याने सक्षमला डोंगरगाव परिसरात सौरभ याने बोलाविले. सक्षम हा साध्यापणाने सौरभला भेटायला गेला. सौरभ आपल्या सात साथिदारांसोबत डोंगरगाव येथे पोहचला. भांडण सोडवायचे दुर सौरभ व त्याच्या सात साथिदारांनी सक्षम याला सपासप मारायला सुरुवात केली. तो गंभीर जखमी झाला. त्याला एम्स येथे भर्ती करण्यात आले. मध्यरात्रीनंतर सक्षमचा मृत्यू झाला.
आरोपी व मृतक हे वर्धा रोड येथील संताजी कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. सक्षमचा शुल्क भांडणातून खुन करण्यात आला. याघटनेमूळे मात्र पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हिंगणा पोलीस पुढील तपास करीत आहेत.


