सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

काळया रेतीच्याघाटाला परवानगी द्या – सलील देशमुख

काळया रेतीच्याघाटाला परवानगी द्या – सलील देशमुख

नागपूर : काटोल व नरखेड तालुक्यातील नदीमध्ये मोठया प्रमाणात काळी रेती आहे. विविध कामांसाठी या रेतीचा वापर होतो. परंतु घाटाची परवानगी नसल्याने या रेतीचा वापर करता येत नसल्याने या घाटांना परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जि.प. सदस्य सलील देशमुख यांनी जिल्हाधीकारी यांच्याकडे एका निवेदनातुन केली.

काटोल व नरखेड तालुक्यात जाम, मदार,वर्धा या मोठया नद्यांसह अनेक लहान नद्या आहेत. यात मोठया प्रमाणात काळी रेती आहे. कन्हान रेती महाग असल्याने व ती परवडत नसल्याने ग्रामिण भागातील अनेक बांधकामामध्ये काळया रेतीचा मोठया प्रमाणात वापर होते. परंतु परवानगी नसल्याने जर नदीमधुन रेती काढल्यास नागरीकांना कारवाईला समोरी जावे लागते. रेती समोर दिसते पण त्याचा कोणताही वापर करता येत नाही. यामुळे काळया रेतीच्या घाटाला शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी समोर येत असल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले.

या काळया रेतीच्या घाटाला परवानगी द्यावी या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी सुध्दा प्रयत्न केले आहे. ज्या प्रकारे कन्हान रेतीच्या घाटाला रितसर परवानगी देवून रेतीचा वापर केला जातो त्याच धर्तीवर जर काळया रेतीच्या घाटाला परवानगी दिल्यास याचा फायदा हा महसुल वाढीत होवू शकतो. काळया रेतीची मागणी असतांना ती मिळत नसल्याने कन्हान रेतीची मागणी वाढली आहे.

यामुळे कन्हान रेतीचा भाव वाढला असून त्याचा फटका हा नागरीकांना बसतो. जर काळया रेती घाटाला परवानगी दिली तर कन्हान रेतीची मागणी काही प्रमाणात कमी होईल व त्या रेतीचा दर कमी होवून सामान्य नागरीकांना याचा फायदा होईल. यामुळे काटोल व नरखेड तालुक्यातील नदीवरील काळया रेतीच्या घाटाला परवानगी देण्याची मागणी सलील देशमुख यांनी जिल्हाधीकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे एका निवेदनातुन केली आहे.

अनेकांना मिळणार स्वयंमरोजगार

काळया रेतीच्या घाटाला परवानगी दिल्यास महसुलात तर वाढ होईलच, शिवाय या भागातील अनेक युवकांना स्वयंमरोजगाराची संधी सुध्दा उपलब्ध होईल. वाहतुकीसाठी लागणारे ट्रक्टर व मणुष्यबळ यामुळे एक नविन आर्थीक कडी निर्माण होवून अनेकांच्या हाताला काम सुध्दा मिळेल. ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था आज शेतीवर अवलंबुन आहे. जर या घाटांना पवानगी दिली तर याचा फायदा हा ग्रामिण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सुध्दा होईल असे मत सुध्दा सलील देशमुख यांनी व्यक्त केले.

- Advertisment -