पं. प्रदिप मिश्रा यांचे ‘शिवमहापुराण’ कथा १७ ऑक्टोबर पासून
नागपुर : ‘एक लोटा जल सभी समस्या का हल’ असे प्रचलित ब्रीदवाक्य म्हणून सनातन धर्माला नवीन दिशा दाखवून संबोधित करणारे मध्यप्रदेश सीहोर कुबेश्वर धाम चे आंतरराष्ट्रीय कथाकार श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या मधुर वाणी मधून ‘शिवमहापुराण’ कथेचे आयोजन मंगळवार १७ ऑक्टोंबर ते शनिवार २१ ऑक्टोंबर पर्यंत लोकसेवा प्रतिष्ठान व मोहन मते मित्र परिवार द्वारे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार मोहन मते यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला चंदन गोस्वामी यांच्यासह आयोजक मंडळ उपस्थित होते.
आमदार मोहन मते यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलतांना सांगितले कि, उमरेड रोड बहादुरा फाटा, टोल नाक्या जवळ, “शिवमंडपम” दुपारी 2 ते सायं 5 पर्यंत राहील. ५५ एकर च्या विशाल प्रांगणमध्ये शिवमंडपम ३५४ बाय ७०० वर्ग फुट चे ४ स्वागत द्वार सहित डोम निर्माण चे कार्य रात्र-दिवस सुरु आहे.
या शिवमंडपम मध्ये २२ एलईडी स्क्रीन लावण्यात येत असून सर्व भक्तगण आरामशीर कथेचा आनंद तसेच लाभ घेतील. शिवमंडपम च्या आत १०० बाय ६० चे मंच बनविण्यात येत आहे, ज्यावर कथाकार पंडित प्रदीप जी मिश्रा ” शिवमहापुराण” कथेचे वाचन करतील. या विशाल आयोजनात मंडप, स्वच्छता, साउंड, सुरक्षा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इत्यादी सर्व प्रकार चे वाहनांची पार्किंग, प्रचार प्रसार, अतिविशेष निमंत्रित स्वागत समिति इत्यादी समितिच्या माध्यमातून शेकडो भक्तजण आपली अमूल्य सेवा प्रदान करतील.
नवरात्रच्या पावन पर्वावर नागपुर व जवळपास चे सर्व भक्तगणांनी शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आव्हान आमदार श्री मोहन मते जी यांनी केलेले आहे. तसेच, कथा स्थळी सर्व भक्तगण आमंत्रित असून सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. येथे विशेष उल्लेखनीय आहे की, कथाकार पंडित प्रदीप जी मिश्रा आपल्या कथाद्वारे सर्व भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात, ज्यामुळे सर्वांना लाभ प्राप्त होतो.


