सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी काँग्रेसला साथ द्या – दिलीप भोजराज

देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी काँग्रेसला साथ द्या – दिलीप भोजराज

कारंजा लाड : सोमवार दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी येथील राहुल नगर येथे कारंजा शहर काँग्रेसने आयोजित केलेल्या प्रभाग निहाय काँग्रेस पक्ष संघटनात्मक बांधनीसाठी *प्रभाग* कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप भोजराज यांनी म्हटले की अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान असतांना राज्यघटनेची समिक्षा करण्याचा प्रयत्न केला गेला होता तेंव्हा सोनियाजी गांधी यांनी संसदेत कडाडून विरोध करीत खबरदार राज्य घटना बदलण्याचा प्रयन कराल तर संसद चालू देणार नाही, तेव्हा पासून आज पर्यंत राज्यघटना अबाधित आहे.

परंतु पुन्हा आता राज्यघटना बदलण्याचा कट केंद्र सरकार करीत आहे.असे प्रतिपादन करून देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी काँग्रेसला साथ द्या असे भावनिक आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्री. दिलीपभाऊ भोजराज यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. धिरज भाऊ लिंघाडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. दिलीपराव सरनाईक यांची महत्वपुर्ण मार्गदर्शनपर भाषणे झाली.

कार्यक्रमाला काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग शहर अध्यक्ष युसब जट्टावाले, सेवादल काँग्रेस शहर अध्यक्ष ऍड.वैभव लाहोटी, कमलेशजी सपकाळ, नितीनजी जाधाव, शिवाजीराव देशमुख, राज चौधरी, अक्षय बनसोड, प्रफुल गवई, फैजल खान, सोराब खान, अयुब भाई, कुंदन तायडे, विठ्ठलराव कवळे, योगेंद्र जमनिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन काँग्रेस सेवादल जिल्हा समन्वयक ऍड. संदेश जैन जींतूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर काँग्रेस अध्यक्ष अमिर खान पठाण यांनी केले.

- Advertisment -