‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३ ला अभूतपूर्व यश; आतापर्यंतचा सर्वात मोठा शुभारंभ
ग्रेट इंडियन फेस्टिव्हलला पहिल्या ४८ तासांमध्ये ९.५ कोटी ग्राहकांकडून भेट: प्रतिसाद, व्यवहार आणि ऑर्डर यांचे प्रमाण आतापर्यतचे सर्वात मोठे
‘प्राइम अली अॅक्सेसच्या पहिल्या २४ तासांमध्ये प्राइम सदस्यांकडून सरासरी दैनंदिन खरेदीच्या तुलनेत १८ पट अधिक खरेदी.
स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, फॅशन व सौंदर्य, गृह सजावट, उपकरणे, फर्निचर, किराणा सामान आणि इतर अनेक श्रेणीमध्ये ५ हजारांहून अधिक नवीन उत्पादने सादर
‘ॲमेझॉन’तर्फे नवीन विक्रेत्यांसाठी रेफरल शुल्कावर ५० टक्के माफीची घोषणा आणि कार्यान्वयीन नेटवर्कवर १ लाखापेक्षा जास्त हंगामी नोकरीच्या संधींची निर्मिती
नागपूर : ‘ॲमेझॉन डॉट इन’च्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३’ या आतापर्यंतच्या सर्वात

मोठ्या उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या ४८ तासांत ग्राहकांकडून सर्वात जास्त ऑर्डर कंपनीला मिळाल्या असून ९.५ कोटी ग्राहकांनी अॅपला भेटी दिल्या आहेत, तर कोट्यवधी रुपयांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. ‘ॲमेझॉन प्राइम’च्या सदस्यांनी प्राइम अर्ली अॅक्सेसच्या (पीईए) पहिल्या २४ तासांमध्ये सरासरी दैनंदिन खरेदीपेक्षा १८ पट अधिक खरेदी केली. सुरुवातीच्या ४८ तासांत लहान आणि मध्यम व्यवसायांमध्ये ३५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून विक्रेत्या भागीदारांसाठी सणासुदीच्या हंगामाची ही सर्वोत्तम सुरुवात ठरली. प्राइम अली अॅक्सेसच्या पहिल्या तासात ८० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक नॉन-मेट्रो शहरांतील होते. या काळात एका सेकंदाला ७५ पेक्षा जास्त या प्रमाणात स्मार्टफोन विकले गेले. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, फॅशन व ब्यूटी, गृहसजावट, उपकरणे, फर्निचर आणि किराणा सामान यांसारख्या श्रेणींमधील ५ हजारांहून अधिक नव्याने सादर झालेली उत्पादने ग्राहकांनी खरेदी केली. अनेक नामांकित ब्रॅड्समधील विस्तृत श्रेणीतील उत्पादनांची निवड ग्राहकांनी केली.
ग्राहकांना जलद आणि अधिक विश्वासार्ह वितरण करता यावे, म्हणून आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून ‘ॲमेझॉन इंडिया’ने १ लाखाहून अधिक हंगामी नोकरीच्या संधी निर्माण केल्या आहेत. यामध्ये मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि चेन्नई यांसारख्या भारतभरातील शहरांमधील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोकऱ्यांचा समावेश आहे. ‘ॲमेझॉन इंडिया’ने यापैकी बहुसंख्य नवीन कर्मचाऱ्यांना आपल्या विद्यमान नेटवर्कमध्ये आधीच नियुक्त करून घेतले आहे. ग्राहकांच्या ऑर्डर सुरक्षितपणे व कार्यक्षमतेने निवडणे, पॅकिंग करणे, कुरिअरकडे पाठवणे, ग्राहकांना वितरण करणे ही कामे हे कर्मचारी करतात. याव्यतिरिक्त, ऑर्डर्सची पूर्तता आणि वितरण यांसाठी कंपनीने एक मजबूत नेटवर्क तयार केले आहे आणि त्याकरीता अनेक जणांशी भागीदारी केली आहे. विक्रेत्यांकडील सामान साठविण्याकरीता कंपनीने ४.३ कोटी घनफूट इतकी जागा उपलब्ध केली असून १५ राज्यांमध्ये आपली पूर्तता केंद्रे स्थापन केली आहेत. याचा फायदा देशातील १४ लाख विक्रेत्यांना होतो.
“द ग्रेट इंडियन फेस्टिव्हलचे सातत्यपूर्ण यश हे आम्ही गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध नवकल्पनांच्या माध्यमातून प्रस्थापित केलेल्या भक्कम पायावर उभे आहे. ॲमेझॉन लाइव्ह, त्यातील मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, बंगाली अशा प्रादेशिक भाषांमध्ये सेवा आणि व्हॉइस शॉपिंग या वैशिष्ट्यांमुळे या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’मध्ये खरेदी करणे खूपच सोपे झाले आहे. आमच्या कोट्यवधी ग्राहकांना हा अविस्मरणीय अनुभव मिळत असून ते समाधानी आहेत. ‘ॲमेझॉन लाइव्ह’मुळे सर्व ब्रड्सना आजकालच्या जाणकार खरेदीदारांसोबत एक सखोल व परस्परसंवादी संबंध कायम ठेवता येत आहेत.” असे प्रतिपादन ‘ॲमेझॉन इंडिया’च्या ग्राहक अनुभव व विपणन या विभागाचे संचालक किशोर थोटा यांनी केले.
आपल्या विक्रेत्यांना उचलून धरण्याच्या वचनबद्धलेचा एक भाग म्हणून, ‘ॲमेझॉन’ने ग्रेट इंडियन रेफरल ऑफर देखील जाहीर केली. याठिकाणी विक्रेते आपल्या मित्रांना ‘ॲमेझॉन डॉट इन’वर विक्री करण्यासाठी संदर्भित करू शकतात आणि ११,५०० रुपयांपर्यंतची बक्षिसे मिळवू शकतात. याव्यतिरिक्त, ऑनलाइन विक्री सुलभ आणि अधिक यशस्वी करण्यासाठी ‘ॲमेझॉन’ने विक्रेत्यांसाठी विविध तांत्रिक उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे, त्यामुळे भारतीय विक्रेत्यांना ऑनलाइन विक्री सुरू करणे सुलभ होते. ‘सेल इव्हेंट प्लॅनर’ या एका साधनाच्या माध्यमातून विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनांवर उत्तम सौदे ऑफर करण्यास, इष्टतम इन्व्हेंटरीसाठी आगाऊ योजना तयार करण्यात आणि विक्री वाढविण्यात मदत होते, तर नवीन ‘सेलर सक्सेस सेंटर’मुळे अॅमेझॉन मार्केटप्लेसमध्ये प्रथमच प्रवेश करणाऱ्या विक्रेत्यांना ऑनबोर्डिंग करण्यास सहाय्य होते.
आमच्या विक्रेत्यांचे नेटवर्क विशाल आहे. त्यांची उत्पादने देशभरातील ग्राहकांपर्यंत सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी ते आमच्यावर विश्वास ठेवतात. त्यांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळते. त्यांच्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. विक्रेते आणि ग्राहक या दोघांच्याही दृष्टीकोनातून महाराष्ट्र ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. आमच्याकडे ॲमेझॉन डॉट इनवर विक्री करणारे १.६ लाखांहून अधिक विक्रेते महाराष्ट्रात आहेत. त्यांच्यासाठी ऑनलाइन विक्रीची प्रक्रिया सुलभ आणि अधिक उत्पादक बनवण्यावर आमचा भर असतो. विक्रेत्यांना त्यांच्या स्थानिक व्यवसायाचे स्वरूप जपून ठेवून आमच्या माध्यमातूनही ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे व जलद व्हावे, याकरीता त्यांना सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि नवकल्पना प्रदान करण्याचा आमचा प्रयत्न आहे, ” असेही किशोर म्हणाले.
‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ गेल्या ८ ऑक्टोबरपासून सुरू झाला. या महोत्सवात महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या व्यवसायांना आपला व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने वाढवण्याची मोठी संधी मिळत आहे. ‘अॅमेझॉन इंडिया’च्या वतीने नील्सन मीडियाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, ८१ टक्के ग्राहक या सणासुदीच्या काळात खरेदी करण्यास उत्सुक आहेत. ऑनलाइन खरेदीची भावना केवळ महानगरांमध्येच नाही तर टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्येही कायम आहे. ७८ टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीवर विश्वास आहे, ६८ टक्के ग्राहकांना ‘अॅमेझॉन डॉट इन’ हे सहज जाताजाता खरेदी करता येण्याजोगे, सोयीचे ‘ऑनलाइन शॉपिंग डेस्टिनेशन’ वाटते. ‘अॅमेझॉन डॉट इन’ हा सणासुदीच्या खरेदीसाठीचा सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय असा ऑनलाइन ब्रँड असल्याचे मत निम्म्याजणांनी मांडले आहे.
‘ॲमेझॉन इंडिया’ने ई-कॉमर्स उद्योगात नवीन बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. ग्राहकांना उत्पादनांची विस्तृत श्रेणी आणि नामांकित ब्रॅड्सकडून खरेदी करण्याची सोय ती प्रदान करीत आहे. गेले ४८ तास सुरू असलेल्या खरेदी महोत्सवाला जे प्रचंड यश लाभले, त्यावरून अतिशय योग्य अशा दरांत अतुलनीय असा खरेदीचा अनुभव विविध प्रकारच्या ग्राहकांना देण्याची ‘ॲमेझॉन इंडिया’ची कटिबद्धता दिसून येते.
‘ॲमेझॉन’ची महाराष्ट्रातील गुंतवणूक
‘ॲमेझॉन’ने गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात लक्षणीय गुंतवणूक केली आहे, तसेच मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. ग्राहक आणि विक्रेते यांना प्रादेशिक भाषेतून व्यवहार करण्याचा अनुभवही ती मिळवून देते. ‘ॲमेझॉन डॉट इन’चे महाराष्ट्रात सुमारे १.६ लाखांहून अधिक विक्रेते आहेत. ते विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करतात. लाखो छोट्या विक्रेत्यांनी ॲमेझॉनच्या ‘प्रोग्रॅम्स आणि टूल्स’द्वारे ई-कॉमर्स स्वीकारले आहे. ‘अॅमेझॉन डॉट इन’चे राज्यात लाखो ग्राहक आहेत आणि हजारो कर्मचारी असलेली अनेक कार्यालये आहेत. त्यांतील बहुतांश कार्यालये मुंबई आणि पुणे येथे आहेत.
आपल्या या कार्यालयांव्यतिरिक्त, ‘ॲमेझॉन’ने महाराष्ट्रात ७० लाख घनफूटांहून अधिक साठवणूक क्षमता असलेली ८ पूर्तता केंद्रे स्थापन करण्यासाठी गुंतवणूक केली आहे. पुरवठा साखळीतील मध्यवर्ती ठिकाणांसाठी ‘ॲमेझॉन’कडे ५.७५ लाख चौ. फुटांपेक्षा जास्त जागा असलेली ६ वर्गीकरण केंद्रे आहेत. या पूर्तता आणि वर्गीकरणाच्या केंद्रांमधून ‘ॲमेझॉन’ला विक्रेते आणि ग्राहकांना सेवा देण्यास मदत होते. त्यातून स्थानिक रहिवाशांसाठी हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतात. आज, ‘ॲमेझॉन डॉट इन’कडे स्वतःच्या मालकीची सुमारे २०० वितरण केंद्रे आहेत, तसेच भागीदारांचीही डिलिव्हरी स्टेशन्स आहेत. राज्यभरात कंपनीची ३६०० हून अधिक ‘आय हॅव स्पेस’ स्वरुपाची स्टोअर्स आहेत.


