सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचा दाखला द्या, जरांगेचे आजपासून आमरण उपोषण

मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचा दाखला द्या, जरांगेचे आजपासून आमरण उपोषण

अन्न, पाणी वैद्यकिय उपचार घेणार नसल्याचा निर्णय

४१ दिवस लोटले सरकारने शब्द पाळला नाही

महाराष्ट्र सरकार ‘टेन्शन’ मध्ये

जालना : मराठा समाजाचे निष्ठावाण नेते मनोज जरांगे पाटील यांनी ४१ दिवसानंतर पून्हा आमरण उपोषण करण्याचा संकल्प केला असून ते आज (बुधवार २५ ऑक्टोबर) पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने आपला शब्द पाळला नसल्यामुळे आपण आमरण उपोषण करीत असल्याचे जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

सरकारने सरसकट कुणबी समाजाचा दाखला मराठा समाजाला द्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकार पुन्हा ‘टेन्शन’ मध्ये आले आहे. विशेष सांगायचे म्हणजे, मंत्री गिरिश महाजन यांनी फोन द्वारे जरांगे पाटलांना आमरण उपोषण करु नका अशी विनंती केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपला दिलेला शब्द पाळला नाही. आमच्या मराठा समाजबांधवांच्या भावनांशी महाराष्ट्र सरकार खेळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा मराठा आरक्षणावर गंभीर नसल्याची टिका जरांगे पाटील यांनी केली आहे. आंदोलन शांततेत करावे, असे आवाहन जरांगे यांनी समाजबांधवांना केले आहे. उपोषण सुरु असताना अन्न, पाणी वैद्यकिय उपचार घेणार नाही, सलाईन लावणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. साखळी उपोषणनाचे रुपांतर आता आमरण उपोषणात केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष सांगायचे म्हणजे, मंत्री गिरिश महाजन यांनी फोन द्वारे जरांगे यांना आमरण उपोषण करु नका, महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात सकारात्मक असल्याचे सांगितले. मात्र जरांगे पाटील आमरण उपोषण करण्यावर ठाम असल्याचे दिसले. उपोषणा दरम्यान मंत्र्यांचा फोन उचलणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

 

 

- Advertisment -