सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

विदर्भात थकीत वीजबिलांच्या वसुलीची मोहीम वेगात सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु

विदर्भात थकीत वीजबिलांच्या वसुलीची मोहीम वेगात
सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु

नागपूर :- विदर्भात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांकडे चालू व थकीत वीजबिलांपोटी 183.84 कोटींची थकबाकी असल्याने वसूली मोहिमेला वेग देत थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गदचिरोली, गोंदीया, भंडारा, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 28) व रविवारी (दि. 29) या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे.

महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे चालू व थकीत वीजबिलांपोटी 183.84 कोटींची थकबाकी आहे. यात अकोला परिमंडलातील 63.85 कोटी, अमरावती परिमंडलात 41.12 कोटी, चंद्रपूर परिमंडलात 5.53 कोटी, गोंदिया परिमंडलात 9.63 कोटी आणि नागपूर परिमंडलात 63.71 कोटीच्या थकबाकीचा समावेश आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे.

महावितरणची आर्थिक भिस्त केवळ वीजबिलांच्या वसुलीवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी यांनी केले आहे. वीजग्राहकांना ‘http://www.mahadiscom.in/’www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने 5 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे. सध्या सुरू असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीजजोडण्याची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे.

थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135/138 नुसार कारवाई करण्यात येत आहे.

 

- Advertisment -