सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

राज्यपाल रमेश बैस दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर

राज्यपाल रमेश बैस दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात तसेच राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १११ व्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी राज्यपाल रमेश बैस १ व २ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर भेटीवर येत आहेत.

शुक्रवार, १ डिसेंबर रोजी राज्यपालांचे पुणे येथून सकाळी १२.१० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होणार आहे. विमानतळावरील राष्ट्रपतींच्या स्वागतानंतर दुपारी १२.२० राजभवनकडे राज्यपालांचे प्रयाण होणार आहे.

राष्ट्रपती दुपारी ३.१० वाजता कुकडे लेआउट येथील श्री. जगन्नाथ मंदिराला भेट देतील व येथे दर्शन घेवून आरतीत सहभागी होतील यावेळी राज्यपालही उपस्थित राहतील. यानंतर दुपारी ४.०० वाजता राष्ट्रपतींच्या हस्ते होणाऱ्या मेडिकलच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर राजभवनकडे प्रयाण व मुक्काम राहील.

शनिवार, २ डिसेंबर रोजी राज्यपाल सकाळी १०.१० वाजता राजभवन येथून कविवर्य सुरेश भट सभागृहाकडे रवाना होतील. येथे सकाळी १०.३० ते ११.३० वाजे दरम्यान राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल उपस्थित राहतील. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळाहून सकाळी ११.५५ वाजता राष्ट्रपतींचे दिल्लीकडे प्रयाण होईल त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर राज्यपाल उपस्थित राहतील. यानंतर राजभवनाकडे प्रयाण करतील.

राज्यपाल यांचे सायंकाळी ५.०० वाजता विमानतळाहून मुंबईकडे प्रयाण होईल.

 

- Advertisment -