सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

यवतमाळ नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणी

यवतमाळ नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणी

विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालानुसार कारवाई करणार – मंत्री उदय सामंत

नागपूर : यवतमाळ नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणाबाबत विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालावर पंधरा दिवसांत कारवाई करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. यवतमाळ नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापनासाठी गैरपद्धतीने डी एम एंटरप्राइजेस कंपनीस पात्र ठरविल्याबाबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री श्री. सामंत यांनी नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणाचा विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार जे दोषी आढळले असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. विभागीय आयुक्त यांच्या चौकशी अहवालानुसार १५ दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सदस्य यशोमती ठाकूर यांनी उपप्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला.

- Advertisment -