सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सीपी अँड बेरार, पलोटी, जेसीपीई महाविद्यालयांची विजयी सुरुवात

सीपी अँड बेरार, पलोटी, जेसीपीई महाविद्यालयांची विजयी सुरुवात

आंतर महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन हँडबॉल पुरुषांच्या स्पर्धेत जीएच रायसोनी, कलोडे कॉलेज, सीपी अँड बेरार, जेसीपीई महाविद्यालयाने प्रतिस्पर्धीला नमवित स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे.

रवी नगरातील विद्यापीठाच्या मैदानावर शुक्रवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत जीएच रायसोनी महाविद्यालयाने आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला ९-६ गोलने नमवित विजयी सुरुवात केली. यानंतर कलोडे महाविद्यालयाने आयडीसीपीला १६-९ ने, सीपी अँड बेरार महाविद्यालयाने वर्धेच्या यशवंत महाविद्यालयाचा १७-१ ने धुव्वा उडवित विजयी सुरुवात केली. तर जेसीपीई महाविद्यालयाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १७-७ आणि तायवाडे महाविद्यालयाने अटीतटीच्या लढतीत धनवटे नॅशनल कॉलेजचा २०-१८ ने नमवित विजयी सुरुवात केली आहे. याशिवाय पलोटी महाविद्यालयाने जीएच रायसोनी कॉलेजचा १४-१२ गोलने पराभव करीत विजयी आगेकूच कायम ठेवली आहे. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त तसेच आंतरराष्ट्रीय हँडबॉल खेळाडू प्रीती सुपारी, आंतरराष्ट्रीय हँडबॉल खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. आश्लेषा इंगोले, प्राचार्य कलोडे महाविद्यालयाचे डॉ. नितीन जंगीटवार आदी उपस्थित होते.

- Advertisment -