सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मेट्रो प्रवाश्यांची पहिली पसंती ऑनलाईन तिकीट खरेदीवर

मेट्रो प्रवाश्यांची पहिली पसंती ऑनलाईन तिकीट खरेदीवर

दररोज डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढते आहे

नागपूर : एका सर्वेक्षणानुसार देशातील 35 टक्के परिवार दैनंदिन आर्थिक व्यवहार हे डिजिटल पद्धतीने करताहेत. यात पे-टू-मर्चंट (P2M) व्यवहारांचे प्रमाण जास्त आहे. सुमारे 80 टक्के ग्राहक किराणा, धान्य खरेदी आणि प्रवास व्यवहारांमध्ये डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करतात. आर्थिक वर्ष 2026 पर्यंत हा आकडा 50% च्या पुढे जाइल.

आर्थिक वर्ष 2023 चा विचार केला तर एकूण डिजिटल पेमेंट पैकी युनिफाईड इंटर फेज (UPI) चा वाटा 84 टक्के आहे.
140 कोटी लोकसंसंख्या असलेला आपला देश डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात ग्लोबल लीडर बनण्याच्या तयारीत आहे. आणि नॉन-कॅश व्यवहराचे प्रमाण घरोघरी 50 टक्क्यांनी वाढले असून सण 2026 पर्यंत देशातील 85 टक्के व्यवसाय डिजिटली पेमेंट पद्धतीकरिता सक्षम झालेले असतील. मागच्या म्हणजे 2022 मध्ये भारताने 89.5 दशलक्ष डिजिटल व्यवहारांची नोंद केली. या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये एकूण जागतिक रिअल-टाइम पेमेंटपैकी भारताचा वाटा 46 टक्के होता.

राष्ट्रीय स्तरावर डिजिटल पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढत असताना, महा मेट्रो नागपूर देखील यात महत्वाची भूमिका निभावतो आहे. दररोज मेट्रो प्रवासाद्वारे मिळणाऱ्या एकूण महसूलापैकी सुमारे 50% हे महा कार्ड, युपीआय पेमेंटचे विविध प्रकार आणि नागपूर मेट्रो ऍपद्वारे डिजिटल स्वरूपाचे असतात.

प्रवासी भाडयाच्या माध्यमाने मिळणाऱ्या एकूण महसुली पैकी महा कार्डद्वारे दररोज सरासरी 34% पेमेंट केले जाते, तर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि नागपूर मेट्रो ऍप मिळून एकूण महसूल 12% पेक्षा जास्त आहे. सरासरी एकूण महसुलापैकी विविध डिजिटल पेमेंट माध्यमाने मिळणारा एकत्रित महसूल हा 46% पेक्षा जास्त असतो.

नागपूर मेट्रोचे प्रवासी महा कार्डचा उपयोग करून मेट्रो प्रवासामध्ये मेट्रो तिकिटावर १०% सवलत मिळवतात. महा कार्डच्या वापरामुळे प्रवाशांना तिकीट काउंटरवर रांगेत न थांबता ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) च्या माध्यमाने फक्त कार्ड टॅप करून सहज पुढे जाता येते, या वस्तुस्थितीमुळे महा कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोख व्यवहार कमी होत असून, मेट्रो प्रवाशांचा डिजिटल पेमेंटकडे कल वाढत असल्याचे दिसत आहे. महा मेट्रोला विश्वास आहे कि, हा कल भविष्यात देखील कायम राहील आणि ऑनलाइन पद्धतीचा वापर करणाऱ्या प्रवाश्यांच्या संख्येत वाढ होईल

महत्वपूर्ण आहे कि, डिजिटल पेमेंटबद्दलच्या वाढत्या जागरूकतेमुळे भविष्यात यामध्ये आणखी वाढ होईल आणि तो 50% चा आकडा देखील पार करेल असा विश्वास महा मेट्रोला आहे. सर्व स्तरांवर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याची गरज लक्षात घेत महा मेट्रोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सहकार्याने 31 ऑगस्ट 2019 रोजी महा कार्ड सादर केले होते.

- Advertisment -