सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

ओल्ड ब्रिज म्युच्युअल फंडतर्फे ओल्ड ब्रिज फोकस्ड इक्विटी फंड हा पहिला एनएफओ (न्यू फंड ऑफर) सादर

ओल्ड ब्रिज म्युच्युअल फंडतर्फे ओल्ड ब्रिज फोकस्ड इक्विटी फंड हा पहिला एनएफओ (न्यू फंड ऑफर) सादर

नागपूर : ओल्ड ब्रिज कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित ओल्ड ब्रिज म्युच्युअल फंड यांनी ‘ओल्ड ब्रिज फोकस्ड इक्विटी फंड’ (ओपन-एंडेड इक्विटी स्कीम, जी कमाल 30 स्टॉक्समध्ये गुंतवणूक करेल (मल्टी-कॅप)) हा पहिला इक्विटी न्यू फंड ऑफर (एनएफओ) सादर करत भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रात पदार्पण केले. गुंतवणूकदारांना निवडक कंपन्यांच्या वृद्धीक्षमतेचा लाभ घेता यावा यासाठी खास संधी उपलब्ध करून देण्याचे या ओपन एंडेड स्कीमचे उद्दिष्ट आहे. 

हा एनएफओ 17 जानेवारी 2024 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत हा एनएफओ सबस्क्रिप्शनसाठी खुला आहे. गुंतवणूकदार रु.2,500 आणि त्यानंतर रु.1 च्या पटीत किमान एसआयपी गुंतवणुकीपासून सहभागी होऊ शकतात. एकरकमी गुंतवणुकीसाठी रु.5,000 ही किमान रक्कम आहे. ही स्कीम S&P BSE 500 TRI शी तुलना करून या स्कीमचा मापदंड निश्चित करण्यात आला आहे.

विविध मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये कमाल 30 स्टॉक्समध्ये धोरणात्मक गुंतवणूक करून दीर्घकीन भांडवलवृद्ध साध्य करणे हा या फंडाचा प्राथमिक हेतू आहे. दीर्घकालीन विचार करता भांडवलवड्धी करण्याची क्षमता असलेले व्यवसाय ओळखण्यासाठी मल्टि-कॅप दृष्टिकोन निश्चित करण्यात आला आहे.

आर्थिक स्थिती भक्कम असलेल्या, दीर्घकालीन फ्रान्चायझी मूल्य असलेल्या आणि सातत्यपूर्ण वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येते. या फंडाचे व्यवस्थापन केनेथ आंद्राद्रे आणि श्री. तरंग अग्रवाल हे अनुभवी गुंतवणूक प्रोफेशनल करणार आहेत. या बदलत्या मार्केट परिस्थितीतून व्यवस्थित वाटचाल करण्यासाठी त्यांचा अनुभव व कौशल्य यांचा उपयोग होईल.

यावर ओल्ड ब्रिज ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीआयओ आणि ओल्ड ब्रिज कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संचालक केनेथ एंड्रेड म्हणाले, “दीर्घकालीन भांडवलवृद्धी करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आमचा पहिला इक्विटी फंड सादर करताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. भक्कम नेतृत्व आणि वृद्धीक्षमता असलेल्या सुरुवातीच्या टप्प्यातील व्यवसायांवर लक्ष केंद्रीत करण्याचा आमच्या गुंतवणूक दृष्टिकोनाशी या फंडची स्ट्रॅटजी सुसंगत आहे.”

ते पुढे म्हणाले, “ओल्ड ब्रिज फोकस्ड इक्विटी फंडचा लाँच हा भारताच्या म्युच्युअल फंड बाजारपेठेच्या अभूतपूर्व वाढीशी संबंधित आहे. एएमएफआय या उद्योग व्यापार संघटनेने प्रकाशित केलेल्या आकडेवारीमध्ये ही वाढ अधोरेखित झाली आहे. 2023 च्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये दोन कोटी नवी गुंतवणूक खाती व फंड ॲसेट्समध्ये 19% वाढ झाली असून भारताने अमेरिका, जपान आणि चीन या जागतिक पातळीवरील बाजारपेठांना या बाबतीत मागे टाकले आहे.

गेल्या दशकात भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाने सहा पटीहून अधिक वाढ अनुभवली आहे. एएमएफआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2013 मध्ये या बाजारपेठेची उलाढाल रु.8 लाख कोटी होती ती 2023 च्या अखेरीस रु.50.8 लाख कोटी इतकी झाली आहे. या लक्षणीय प्रवासामुळे या बाजारपेठेची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता व स्वीकारार्हता वाढली आहे. यातून भारताच्या यशोगाथेच्या पार्श्वभूमीवर उत्क्रांत होण्याची या बाजारपेठेची क्षमता दिसून येते.

फंडची ठळक वैशिष्ट्ये

कॉन्सन्ट्रेशन आणि अल्फा जनरेशन : सर्व मार्केट-कॅप्समध्ये (मल्टि-कॅप) निवडक कमाल 30 स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून ॲक्टिव्ह अल्फा जनरेशनच्या माध्यमातून दीर्घकालीन परताव्याचे उद्दिष्ट. खरेदी करा व धरून ठेवा धोरण : भक्कम वृद्धी क्षमता असलेल्या कंपन्या निवडून खरेदी करा व धरून ठेवा हा शिस्तबद्ध दृष्टिकोन बाळगून दीर्घकालीन भांडवलवृद्धीवर लक्ष केंद्रीत.

कमी ऋण व उच्च क्षमता : परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता व स्थैर्यासाठी कमी ऋण व उच्च भांडवल कार्यक्षमता असलेल्या वित्तीय दृष्ट्या भक्कम असलेल्या कंपन्यांना प्राधान्य. सुरुवातीच्या टप्प्यातील कंपन्या निश्चित करणे : आपल्या वृद्धीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्य कंपन्या टारगेट करणे, या कंपन्या मार्केट लीडरशिप प्रस्थापित करताना त्यांच्या संभाव्य वाढीमध्ये सहभागी होणे.

अनुभवी व्यवस्थापन 

30 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या आणि यशस्वी कामगिरीची पार्श्वभूमी असलेल्या श्री. केनेथ आंद्राद्रे या अनुभव फंड मॅनेजरचे नेतृत्व. अतुलनीय सेवा देण्याच्या आमच्या निर्धाराशी सुसंगत राहत ओल्ड ब्रिज म्युच्युअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांना सेवा प्रदान करण्यासाठी भक्कम मल्टि-चॅनल दृष्टिकोन स्वीकारला आहे.

एएमएफआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दशकात, भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची वाढ सहा पटीहून अधिक झाली. 2013 मध्ये या बाजारपेठेची उलाढाल रु.8 लाख कोटी होती ती 2023 च्या अखेरीस रु.50.8 लाख कोटी इतकी झाली आहे. या लक्षणीय प्रवासामुळे या बाजारपेठेची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता व स्वीकारार्हता वाढली आहे. यातून भारताच्या यशोगाथेच्या पार्श्वभूमीवर उत्क्रांत होण्याची या बाजारपेठेची क्षमता दिसून येते.

ओल्ड ब्रिज म्युच्युअल फंडबद्दल

ओल्ड ब्रिज म्युच्युअल फंड हा ओल्ड ब्रिज कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट फंड लिमिटेड प्रायोजित फंड आहे. ओल्ड ब्रिज कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील स्वतंत्र गुंतवणूक मॅनेजर कंपनी असून 2015 मध्ये ही कंपनी स्थापन करण्यात आली.

डिसेंबर 2023 पर्यंत या कंपनीतर्फे रु.80 अब्ज एयूएम होती. ही कंपनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि संशोधनाधारित गुंतवणूक पद्धतीसाठी ओळखली जाते. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखीमांच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा

- Advertisment -