सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

विद्यार्थ्यांना आता नागपूरमध्येच घेता येणार ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगचे शिक्षण

विद्यार्थ्यांना आता नागपूरमध्येच घेता येणार ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगचे शिक्षण

फ्रेमबॉक्स इन्स्टिट्यूट धरमपेठमध्ये सुरु 

नागपूर: मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी राष्ट्रीय संस्था फ्रेमबॉक्स इन्स्टिटयूट आता नागपूरमधील धरमपेठ भागात सुरु झाले आहे. पदवी अभ्यासक्रमांसह ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, ग्राफिक आणि वेब डिझायनिंग आणि फोटोग्राफीचे स्पेशलायझेशन कोर्स येथे शिकवले जाणार आहेत. फिक्कीचे चेअरमन आशिष कुलकर्णी, फ्रेमबॉक्स २.०चे व्यवस्थापकीय संचालक राजेश तुराखिया यांच्या हस्ते या इन्स्टिट्यूटचे उदघाटन झाले असून या प्रसंगी युवा इनफ्लूसर शशांक गट्टेवार, नागपूर फ्रेमबॉक्सचे संचालक सुयोग खडक्कर उपस्थित होते. 

फ्रेमबॉक्स विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्टुडिओची कलात्मक गुणवत्ता, दर्जेदार कार्यक्रम, नवीन तंत्रज्ञानासह तांत्रिक गोष्टींचा वापर करतात. तसेच

अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण, थेट प्रकल्पांवर काम केले जाते. विद्यार्थ्यांना भारतातील आघाडीच्या ॲनिमेशन आणि VFX स्टुडिओमध्ये करिअरच्या संधी प्रदान करण्यासाठी फ्रेमबॉक्सने सर्वात पारदर्शक प्लेसमेंट पोर्टल तयार केले आहे. विद्यार्थी DNEG, Technicolor, Prime Focus, Framestore, Pixel Digital Studio, Rockstar, Red Chili VFX, Weta Digital, Ascension, DreamWorks, Legend, Makuta Visual Effects, MPC, Viacom 18, Golden Robot, NY VFX वाला इत्यादींसोबत काम करत आहेत.

फ्रेमबॉक्सचे संचालक, संस्थापक राजेश आर. तुराखिया म्हणाले की, कलाकार सॉफ्टवेअर कसे वापरायला शिकतो यापेक्षा कलाकार सॉफ्टवेअरकडे कसे पाहतो हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याला उद्योगासाठी तयार कलाकार बनवण्यासाठी सर्वोत्तम ज्ञान देण्यासाठी आम्ही आमच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये या कलात्मक दृष्टिकोनाचे मिश्रण करतो. आम्ही ‘टेक्निकल आर्टिस्ट ट्रेनिंग’ या पद्धतीचा अवलंब करतो जिथे आम्ही नवशिक्या विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरचे तांत्रिक ज्ञान आणि कलात्मक आकलनाचे सौंदर्यविषयक ज्ञान देऊन प्रशिक्षण देतो.” तसेच शिकण्याच्या तंत्रांवर आणि सर्जनशीलतेवरही लक्ष केंद्रित करतो.

भारतीय ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स प्रशिक्षण उद्योगात आघाडीवर असल्याने, भारताच्या वेगाने वाढणाऱ्या ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योग मानक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी फ्रेमबॉक्सद्वारे आमची नियुक्ती केली जात आहे.

फ्रेमबॉक्स नागपूरचे संचालक सुयोग खडक्कर म्हणाले की, “७० टक्के प्रात्यक्षिक आणि ३० टक्के कौशल्य शिक्षणावर आमचा भर आहे. केवळ पारंपरिक शिक्षण पद्धतीचा अवलंब न करता नोकरीभिमुक आणि उद्योगांना लागणाऱ्या कौशल्यांवर आमचा अभ्यासक्रम बनविण्यात आलेला आहे”. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये सहजरित्या यश मिळणार आहे.

- Advertisment -