उद्धव ठाकरेंची वर्तणूक मनोरुग्णासारखी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप
उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागत आहेत, त्यांची मानसिक स्थिती ढासळत आहे. त्यांना लवकरच हॉस्पिटलमधे घेऊन जायची गरज आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी पाहिली तर पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यावर ते प्रतिक्रिया देत होते.
ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना पुत्र प्रेम आहे. त्यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यांना हे माहिती आहे की आता आयुष्यभर माझ्या घरातले कोणीही मंत्री होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंनी चोरुन मुख्यमंत्रिपद घेतले आणि शिवसैनिकांना सोडून स्वत:च्या मुलाला मंत्री केले. त्याऐवजी एका शिवसैनिकाला मोठे करता आले असते. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले असेल तर मुलाला मंत्री केले.”
नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,महाराष्ट्राच्या लायक व्यक्तींच्या यादीमध्ये क्रमांक एकवर माननीय देवेंद्र फडणवीस असतील. आपण जर महाराष्ट्रातील नालायक लोकांचं सर्वेक्षण केलं तर उद्धव ठाकरे दिसतील. ठाकरे यांची लोकप्रियता शरद पवार आणि काँग्रेससोबत बसून कमी झाली आहे शो आहे. त्यांना माहिती आहे की ते या लोकसभा निवडणुकीनंतर घरीच बसणार आहेत.
नेतृत्वाचा एक्सेस संपला
नेतृत्वाचा एक्सेस जिथे संपतो तिथे पक्ष संपतो, म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर हे दिवस आले आहे असे सांगून श्री बावनकुळे म्हणाले की, त्यांना त्यांच्याच पक्षातील एका शिवसैनिकाला मंत्री करता आले असत पण स्वत :च्या मुलाला त्यांनी मंत्री केले. त्यांना माहिती आहे की त्यांच्या घरातला आता कोणी मंत्री होऊ शकणार नाही.
पवारांच्या काळात सर्वाधिक शेतकऱी आत्महत्या
शरद पवार तुम्ही आता शेतकऱ्यांबद्दल बोलत आहात. कृषिमंत्री असताना राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तेव्हा ना हमी भाव मिळायचा, ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळायचा, शेतकऱ्यांना वीज मिळाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.