मुंबईच्या डोंबिवली MIDC मध्ये लागली भिषण आग, चार जणांचा मृत्यू !
सहा किलोमीटर पर्यंत स्फोटांचा आवाज, जवळचे शोरुमही खाक
डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली आहे. यात चार जणांचा मृत्यू झालेला आहे. डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा येथील मेट्रो केमिकल कंपनीजवळ असलेल्या अंबर केमिकल कंपनीत ही आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.
आगीसंदर्भात एमआयडीसीने दिलेल्या माहिती नुसार, दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी आग लागली आहे. अंबर केमिकल कंपनी, मेट्रो कंपनी जवळ, एम.आय.डी.सी. फेज-०2, सोनारपाडा, डोंबिवली (पुर्व). या ठिकाणी डोंबिवली एम.आय.डी.सी. मध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली आहे.
डोंबिवली एम आय डी सी मधील बाजूला आसलेल्या हुंडाई शोरूम ला आग लागली आहे. आजू बाजूच्या राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षा स्थळी हलविण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये 30 ते 40 लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
या स्फोटात 7 ते 8 कर्मचारी यांना गंभीर दुखापत झाली आहे. स्फोटामुळे अनेक वाहनांचे आणि अनेक घरांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून अध्यापही आगीवर नियंत्रण करता आले नाही. मे. मेट्रोपॉलिटन कंपनी, मे. के.जी. कंपनी, मे. अंबर केमिकल कंपनी आदी कंपनीमध्ये हि भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण करण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरु आहे. याघटनेमुळे मात्र महाराष्ट्र सरकारची झोप उडाली आहे.