बापरे..बाप नागपुरात पारा ५६ अंशावर !
नागपूर : नागपुरकरांनो सावधान सुर्य आग ओकत आहे. गुरुवार (३० मे) रोजी एका हवामान केंद्रानं ५६ अंश सेल्सिअस अशी उपराजधानीच्या तापमानाची नोंद केली आहे. हे ऐकूण नागपुरकरांमध्ये चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
IBMTV9 DIGITAL NEWS च्या टीमने हवामान खात्याने नोंद केलेल्या तापमानाची पडताळणी केली. त्यात सत्य आढळल. गुरुवार (३० मे) रोजीचे तापमाण ५६ अंश सेल्शिअस असल्याचे ते यंत्र दाखवित होते. हे बघून नागपुरकरांचा पारा वाढला. ५० च्या वर नागपुरचे तापमाण असताना देखिल आगीच्या घटना घडल्या नाहीत, हे विशेष. पण आश्चर्य व्यक्त केले जात होते.
नागपुरचे तापमान ५६ अंश सेल्सिअस असल्याची नोंद कुठल्या हवामान खात्याने केली असा प्रश्न नागपुरकरांना भेडसावित होता. रामदास पेठ भागात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा अंदाजे २४ हेक्टर परिसर आहे. याच जागेवर स्वयंचलित हवामान केंद्र आहे. याच हवामान केंद्राने गुरुवार (३० मे) रोजीचे तापमाण ५६ अंश सेल्शिअस असल्याची नोंद केली. हवामान विभागाला यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, नागपुरच्या उपरोक्त दिवसाच्या तापमानाचा आकडा चुकीचा आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या सेन्सरमध्ये बिघाड झाला असल्याने चुकीचं तापमान नोंदवण्यात आलेल आहे.
इतर स्वयंचलित हवामान केंद्र आणि हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार गुरुवार (३० मे) रोजी चे तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली. सेन्सर इलेक्ट्रॉनिक असल्याने एका विशिष्ट तापमानाच्या वर गेल्यानंतर त्यामध्ये बिघाड होऊ शकतो, असेही हवामान विभागातर्फे स्पष्टिकरण देण्यात आले. हवामान केंद्राच्या वेबसाईटवरून ५० अंशाच्या वर गेलेलं तापमान चुकीचं असल्यानं ते काढून टाकण्यात आले.